शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील 145 कि.मी. रस्त्यांवर खड्डे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 12:34 IST

ग्रामीण भागातील रस्त्यांची दैना कायम

ठळक मुद्दे 4 कोटींचा खर्चनिविदांमधील कामे बाकी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17-  खड्डेमुक्त रस्ते करण्याची मुदत 15 डिसेंबर रोजी संपली असली तरी अद्यापही जळगाव जिल्ह्यातील  145 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम अपूर्ण आहे.  आतार्पयत झालेल्या कामावर  जिल्ह्यात 4 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. फक्त 145 कि.मी. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अपूर्ण असल्याचा दावा भलेही सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला असला तरी जळगाव तालुक्यासह अनेक तालुक्यांमधील अनेक रस्त्यांची दैना कायम आहे.

राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्गावर खड्डे पडून त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर्पयत खड्डेमुक्त रस्ते करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार जिलत कामांना सुरुवात झाली मात्र अद्यापही ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दैना कायम आहे. 

निविदांमधील कामे बाकीनिविदांतर्गत करण्यात येणारी कामे अद्याप अपूर्ण आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्ग मिळून एकूण साडेचार हजार कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 2000 कि.मी. रस्त्यांवरील खड्डे याअंतर्गत बुजवायचे होते.  13 डिसेंबर्पयत या 2000 कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी 1750 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येऊन साधारण 90 टक्के काम झाले होते. त्यानंतर दोन दिवसात उर्वरित काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र खड्डेमुक्त मोहिमेपूर्वी काही रस्त्यांचे काम निविदा काढून त्यांचा ठेका देण्यात आलेला होता. त्यामुळे हे काम अद्यापही सुरूच आहे. यामध्ये 145 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे बाकी आहे. या संदर्भात ठेकेदारांना हे कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पावसामुळे पुन्हा कामखड्डेमुक्तीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यात या कामास सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी खड्डे पुन्हा उघडे पडले. यात एकटय़ा चाळीसगाव तालुक्यात 10 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खडय़ांचे काम पुन्हा करावे लागले, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

खड्डेमुक्तीसाठी 4 कोटींचा खर्चखड्डेमुक्ती मोहिमेसाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांसाठी चार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. खड्डेमुक्ती हा दोन वर्षाचा कार्यक्रम मंजूर असून एका वर्षात तीन टप्प्यात हे काम होणार आहे. त्यानुसार या मोहिमेंतर्गत पहिल्याच टप्प्यात 4 कोटींचा खर्च झालेला आहे. 

 खड्डेमुक्तीच्या कामांतर्गत  बुजविण्यात येणा:यासर्व खड्डय़ांचे काम पूर्ण झाले असून यापूर्वी दिलेल्या निविदांमधील कामे होणे बाकी आहे. यासाठी संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे खराब झालेल्या खड्डय़ांचीही कामे पूर्ण झाली आहेत. - व्ही.बी. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.