शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणारे १३३ नागरिक आढळले पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही. पॉझिटिव्ह येणाऱ्यांसह मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. अशात संचारबंदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही. पॉझिटिव्ह येणाऱ्यांसह मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. अशात संचारबंदी व नाइट कर्फ्यूचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करीत रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची पोलीस व आरोग्य विभागाकडून रस्त्यावरचं अँटिजन चाचणी केली जात आहे. गेल्या चार दिवसांत विनाकारण फिरणारे १३३ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना उपचारार्थ कोविड केअर सेंटरमध्‍ये पाठविण्‍यात आले आहे.

३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी व नाइट कर्फ्यूचे आदेश १४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत, तरीही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी संपूर्ण जिल्ह्यात दररोजी रात्री आठ वाजल्यापासून तपासणी सुरू केली. यात रस्त्यावर पोलिसांच्या पथकासोबत डॉक्टर, मदतनीस देण्यात आले आहेत. रात्री आठ वाजल्यापासून जिल्हाभरात पेट्रोलिंग, फिक्स पॉइंट येथे पोलिसांकडून अँटिजन तपासणी करण्यात येत ओहत. विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट करून पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांना तत्काळ कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात येत आहेत. गेल्या चार दिवसांत एकूण २ हजार ६९७ नागरिकांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात पॉझिटिव्ह आलेल्या १३३ रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस दलाकडून कळविण्यात आली आहे.