शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

१३ वर्षीय मुलीवर प्रौढाचा अत्याचार

By admin | Updated: February 27, 2017 01:09 IST

जळगाव : घरात कोणी नसल्याची संधी साधत शेजारीच राहणाºया सुभाष तोताराम सोनवणे (वय ५५ रा.मेहरुण, जळगाव) या प्रौढाने १३ वर्षांच्या एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना मेहरुणमध्ये उघडकीस आली आहे

जळगाव :  घरात कोणी नसल्याची संधी साधत शेजारीच राहणाºया सुभाष तोताराम सोनवणे (वय ५५ रा.मेहरुण, जळगाव) या प्रौढाने १३ वर्षांच्या एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना मेहरुणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित सोनवणे फरार झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पीडीत मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून सुभाष सोनवणे हा तिच्या घरात गेला. प्रारंभी तिच्याशी गोड बोलून नंतर त्याने पीडितेवर अत्याचार केला. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार संध्याकाळी कामावरुन घरी आलेल्या आईला सांगितला. समाजात बदनामी होईल, या हेतूने आईने दोन दिवस याबाबत कुठेच वाच्यता केली नाही. शनिवारी पतीला संपूर्ण घटना कथन केली. एकीकडे बदनामीची भीती तर दुसरीकडे तक्रार केली नाही तर गुन्हा करणाºयाची हिंमत बळावू शकते. या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या पीडितेच्या पालकांनी शनिवारी पोलीस स्टेशन गाठले. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक सचिन बागुल यांच्याकडे हकीकत कथन केली.रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या महिला उपनिरीक्षक सुजाता राजपूत यांना बोलावून पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेण्यात आला. त्यानंतर सुभाष सोनवणे याच्याविरुध्द कलम ३७६(२) (आय) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखलची कुणकुण लागताच संशयित फरारपीडित मुलगी व तिचे आई वडील आपल्याविरुध्द तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्याचे समजताच सुभाष सोनवणे हा फरार झाला. गुन्हे शोध पथक त्याच्या शोधार्थ गेले असता तो घरी नव्हता, तसेच अन्य ठिकाणीही त्याचा शोध घेतला मात्र, तो मिळून आला नाही. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक कविता भुजबळ करीत आहेत. गेल्या वर्षीही मेहरुणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. पोलिसांनी त्याला लागलीच अटक केली होती.