शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात ११९६ अँटीजन तपासण्या, २१० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 15:25 IST

उपजिल्हा रुग्णालयात महिनाभरापासून, तर नुकतेच तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनासाठी कोविड-१९ अँटीजन तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्दे अहवालाच्या समांतर रुग्णलक्षणं ताळमेळ१२ रूग्णांना मागणीवरून दिला अहवाल

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयात महिनाभरापासून, तर नुकतेच तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनासाठी कोविड-१९ अँटीजन तपासणी केली जात आहे. अँटीजन तपासणी निष्कर्षात एकूण रुग्णांच्या अहवालात ९४.५ टक्के अहवाल निगेटिव्ह तर साडेपाच टक्के रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १२ रूग्णांच्या मागणीवरून कोविड-१९ चा अहवाल देण्यात आला असून, हे मागणी झालेले सर्व अहवाल निगेटिव्ह होते.अहवालाच्या समांतर रुग्ण लक्षणंकोरोना संसर्गजन्य आजार ग्रामीण भागात पाय पसरवत आहे. उपाययोजना म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणावर होणाऱ्या आरटीपीसीआर तपासणी पाठोपाठ आता तालुका स्तरावर कोरोनासाठी कोविड-१९ अँटीजन तपासणी सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरटीपीसीआर तपासणीच्या तुलनेत कोविड-१९ अँटीजन तपासणीबाबत अनेक शंका कुशंका असल्या तरी या तपासणी अहवालाच्या समांतर रुग्ण लक्षणं यांची ताळमेळ बसत असल्याने तालुकास्तरावर कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार होत आहेत. परिणामी जिल्हा स्तरावरील कोविड रुग्णालयाचा भार कमी होऊन तालुका स्तरावर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार होत आहे आणि उपचार होऊन रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे.११९६ तपासण्या, २१० पॉझिटिव्हयेथील उपजिल्हा रुग्णालयात १३ जुलैपासून कोविड-१९ साठी अँटीजन तपासणी सुरू झाली आहे. १७ आॅगस्टपर्यंत १ हजार १५१ रुग्णांची कोविड-१९ तपासणी करण्यात आली. यात ९४६ रुग्ण निगेटिव्ह तर २०५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर तालुक्यातील रुईखेडा, अंतुर्ली, उचंदे व कुºहा प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील गेल्या पाच दिवसांपासून अँटीजन टेस्ट करण्यास सुरुवात झाली. ४५ तपासण्या झाल्या आहेत यात ५ रुग्ण कोविड-१९ पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात १ हजार १९६ तपासण्या झाल्या. यात २१० अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह येण्याचा टक्का हा ५.६ इतका आह.ेमागणी केल्यास दिला जातो अहवालमहानगर व जिल्ह्याच्या ठिकाणावर कोविड-१९ च्या अँटीजन तपासणी अहवालाबाबत गेल्या काळात गदारोळ उडाला होता. अँटीजन व आरटीपीसीआर तपासणी अहवालात तफावत असल्याची आरोड झाली होती. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल देण्याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. परिणामी निगेटिव्ह आलेल्यांपैकी कोणी अहवाल मागितल्यास उपजिल्हा रुग्णालयातून तो दिला जात आहे. आतापर्यंत १२ जणांना हा अहवाल देण्यात आला आहे.कोविड-१९ अँटीजन टेस्ट सुरू होऊन महिना झाला आहे. आतापर्यंत अहवालात तफावत दिसून आलेली नाही.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल देण्याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. आतापर्यंत १२ जणांना मागणीवरून अहवाल देण्यात आले आहेत. ते सर्व निगेटिव्ह होते.-डॉ.योगेश राणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर