शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत ११४३ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 20:51 IST

एकूण १२१३ अर्ज : आता राहिले शेवटचे दोन दिवस

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात सोमवारी एकूण एक हजार १४३ उमेदवारी अर्ज झाले आहे. जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एक हजार २१३ अर्ज दाखल असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे या दोन दिवसात गर्दी होण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागात दिवसेंदिवस निवडणुकीचा रंग चढत आहे. अनेक गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढतीची चिन्हे आहे. आमदारांनी त्या-त्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले असले तरी अद्याप कोणताही प्रतिसाद नागरिकांनी दिलेला नाही. अनेक गावांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात दोनऐवजी तीन पॅनलमध्ये निवडणुका लढविण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अनेक पॅनलचे अद्याप उमेदवार ठरले नसल्याचे बहुतांश ग्रामपंचायतींसाठी अद्यापही अर्ज दाखल झालेले नाही.सर्वाधिक अर्ज जळगाव तालुक्यातूनउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवार, २८ डिसेंबर रोजी एक हजार १४३ अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नव्हता. दुसऱ्या दिवशी २४ रोजी एकूण ७० अर्ज दाखल झाले होते. सोमवार, २८ रोजी दाखल एक हजार १४३ व पूर्वीचे ७० असे एकूण एक हजार २१३ अर्ज दाखल झाले आहे. सोमवारी सर्वाधिक १५८ अर्ज जळगाव तालुक्यात दाखल झाले. त्या खालोखाल जामनेर तालुक्यात १४९, रावेर व चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी १०४ अर्ज दाखल झाले. सर्वात कमी २३ अर्ज मुक्ताईनगर तालुक्यात दाखल झाले.दोनच दिवस शिल्लकउमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहे. सोमवारी झालेली गर्दी पाहता मंगळवारी व बुधवारी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव