जळगाव : मनपा निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत शहरात १३.३२ टक्के मतदान झाल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून काही प्रभागांमधील किरकोळ वाद वगळता दुपारी १२ पर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. सकाळी मुख्य बाजारपेठ परिसरासह उपनगरातील मतदान केंद्रावर सकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत बºयापैकी उत्साह होता. मात्र, त्यानंतर पून्हा ९ ते ११.३० पर्यंत अनेक मतदार केंद्रावर शुकशुकाट पहायला मिळाला. तर काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रात अडचणी आल्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळेपुरती थांबविण्यात आली होती. तसेच पिंप्राळा, खोटेनगर भागात उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद झाल्याचीही माहिती मिळाली आहे. या दोन-चार घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत असून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात एकही वाहनाला प्रवेश दिला जात नाही. सकाळी ९.३० वाजेपर्यंत १८ हजार ५४९ मतदारांनी मतदान केल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जळगाव मनपा निवडणूक : सकाळी ११.३० वाजेपर्यंत शहरात १३.३२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 13:43 IST
किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत
जळगाव मनपा निवडणूक : सकाळी ११.३० वाजेपर्यंत शहरात १३.३२ टक्के मतदान
ठळक मुद्देकाही प्रभागांमधील किरकोळ वाद वगळता दुपारी १२ पर्यंत मतदान प्रक्रिया शांततेततगडा बंदोबस्त