शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

  उसाच्या १०००१ रोपाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:55 IST

 सावखेडासीम (ता. यावल) येथील शेतकरी संतोष अनिल बडगुजर यांनी १०००१ उसाच्या वाणाचे रोप तयार करून विक्री सुरू केली.

ठळक मुद्देशेतीसह सुरू झाला जोडधंदादौºयातून मिळाला रोजगार सावखेडासीम येथील शेतकºयाचा यशस्वी प्रयोग

आॅनलाईन लोकमत, दि़- २० जळगाव : सांगली येथील राजाराम बापू साखर कारखान्यात उसाच्या रोपनिर्मितीचा प्रयोग सावखेडासीम (ता. यावल) येथील शेतकरी संतोष अनिल बडगुजर यांनी शिकला आणि तोच जळगावातही सुरू केला़ १०००१ उसाच्या वाणाचे रोप त्यांनी तयार करून विक्री सुरू केली आहे़ यातून त्यांना शेतीसह जोडधंदा मिळाला आहे़ दिवसाला तीन हजार खांडवे तयार करून चांगल्या उसाच्या रोपनिर्मितीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. संतोष बडगुजर हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करीत आहेत. त्यात त्यांना वडील अनिल बडगुजर यांचे मार्गदर्शन व साथ मिळत आहे़ बडगुजर यांनी टिश्यूकल्चर केळी रोपाप्रमाणे चॉप कटर मशीन आणले आहे़ त्यातून रोज तीन हजार उसाचे खाळंबे तयार केले जातात़ त्यातील डोळे काढून चुन्याच्या निवळीत टाकून व तयार केलेल्या मेलाथिआॅन व बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून रोपांना ट्रेमध्ये टाकले जाते़ यातून चांगल्या गुणवत्तेच्या रोपांची निर्मिती होते आहे़कार्बेनडिझमचा वापरया रोपाच्या निर्मिती दरम्यान जमिनीतून तयार होणाºया बुरशीजन्य रोगाची बाधा होण्याची शक्यता असते. यासाठी तसेच चांगली उगवण होण्यासाठी उसाची बेणे प्रक्रिया केली जाते़ त्यासाठी कार्बेनडिझम या बुरशीनाशकाचा वापर केला जातो़ तीन वर्षांपूर्वी मधुकर साखर कारखान्याच्या वतीने काही शेतकरी पश्चिम महाराष्टÑात अभ्यास दौºयावर गेले होते. सांगली येथील राजाराम बापू साखर कारखान्यात उसाच्या रोपनिर्मितीचा प्रयोग त्यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी या रोपाची निर्मिती स्वत: सुरू केली.४० हजार रोपांची मागणीनिरोगी आणि चांगले उत्पन्न देणाºया या वाणाच्या रोपांची ४० हजार यावल तालुक्यातील शेतकºयांनी मागणी केली आहे. सध्या अडीच रुपये प्रती रोपाप्रमाणे उसाच्या रोपाची विक्री करण्यात येत आहे. मेलाथिआॅन ५० ई़सी़ ३०० एम.एल. अधिक कार्बेनडिझम १०० ग्रॅम १०० लीटर पाण्यात मिसळून १० ते १५ मिनिट बुडवून ते ट्रे मध्ये टाकले जातात. त्यामुळे रोप निरोगी निघते. या रोपाची लागवड साडेचार फूट अंतरावर करावी. त्यामुळे एका रोपाला किमान २५ ते ३० फुटवे निघून एकरी १०० टनप्रमाणे उसाचा उतारा निघतो. या तंत्राचा वापर केल्यास ऊस लागवड शेतकºयासाठी फायदेशीर ठरत असते. बडगुजर यांनी त्याचा प्रत्यक्षात प्रयोग करून अनुभव घेतला आहे़

१०००१ ऊस वाणानंतर सेंद्रिय भाजीपाला उत्पादन करण्याचा मानस आहे. सुरुवातीला परिवारासाठी नंतर अन्य शेतकºयांना ते विक्री करण्यात येणार आहे. सध्या १०००१ ऊस वाणाच्या रोप निर्मितीकडे लक्ष आहे. टिश्यूकल्चर केळी बियाण्याप्रमाणेच या रोपासही प्रतिसाद मिळत आहे.- संतोष अनिल बडगुजर, सावखेडासीम ता. यावल, जि. जळगाव.