शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील १० तरुणांनी सर केले ‘संदकफू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 14:33 IST

हिमालयातील पश्चिम बंगालमधील दार्जींलिंग जिल्ह्यात स्थित ‘संदकफू’ शिखरावर जळगाव जिल्ह्यातील १० साहसी तरुणांनी अवघ्या पाच दिवसांत चढाई केली.

ठळक मुद्देपाच दिवसात केली ५४ कि.मी.ची चढाईहिमालयातील अवघड शिखर केले पार
संकेत पाटीलखिर्डी, ता.ता.रावेर : भारतातील अत्यंत कठीण मानल्या गेलेल्या हिमालयातील पश्चिम बंगालमधील दार्जींलिंग जिल्ह्यात स्थित ‘संदकफू’ शिखरावर जळगाव जिल्ह्यातील १० साहसी तरुणांनी अवघ्या पाच दिवसांत चढाई केली. याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. पश्चिम बंगालमधील दार्जींलिंग जिल्ह्यात असलेले संदकफू हे शिखर सिंगलिला रेंजमधील १२ हजार फूट उंचीवर असलेले सर्वांत उंच शिखर असून नेपाळ सीमेच्या अगदी जवळ आहे. संदकफू शिखर गाठून जगातील पाच सर्वोच्च शिखरांपैकी माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा, लाहोत्से व मकालू अशी चार शिखरे येथून दिसतात. युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने डिसेंबर- जानेवारी महिन्यात गिर्यारोहकांसाठी संदकफू शिखर सर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात जिल्ह्यातील १० तरुणांनी सहभाग नोंदविला होता. अवघ्या पाच दिवसांत त्यांनी ५४ किलोमीटर चढाई करीत हे शिखर गाठले.ताशी ७० ते ८० कि.मी. वेगाने वाहणारे थंड वारे, तापमान कमाल एक ते किमान उणे आठ अंश, सभोवताली हाडे गोठवणारी थंडी, प्राणवायूची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे शिखर सर केले. याची सुरुवात पश्चिम बंगालमधील दार्जींलिंग येथील बेस कॅम्पवरुन झाली. ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी दार्जींलिंग हा ६,७०० फुटांवरचा बेस कॅम्प, पुढे धोत्रे (८,५०० फुट), तुंबलिंग (१०,०००फुट), कालापोखरी (१०,१९६फुट), संदकफू (१२,०००फुट), श्रीखोला (७,४९८फुट) असे कॅम्प होते. कालापोखरी ते श्रीखोला दरम्यान दरम्यान संदकफू हे बारा हजार फुटांवरील सिंगलीला रेंजमधील सर्वांत उंच शिखर आहे. चढाईसाठी अत्यंत अवघड व धोकादायक मानले जाते. या शिखराचा रस्ता मणिबंजन पासुन सुरु होतो. सुमारे ५४ किमी लांबीचा रस्ता खूपच सुंदर आहे. येथील हिमालयातील कोब्रा लिलींच्या विपुलतेमुळे संदकफूला ‘विषारी वनस्पतींचा पर्वत’ म्हणून ओळखले जाते. हा एक कठीण ट्रॅक असल्याने गिर्यारोहकांना येथे जाण्यापूर्वी शरीराच्या तंदुरुस्तीची खूप काळजी घेतली जाते. असे अत्यंत कठीण शिखर सर केल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.या गिर्यारोहकांचा सहभागरोमिंग राजपूत (भुसावळ), अनिल महाजन (वरणगाव फॅक्टरी), डॉ.राहुल भोईटे (वरणगाव), डॉ. रवींद्र माळी (वरणगाव), दिनेश पाटील (खिर्डी बुद्रूक), श्रीकांत माळी (वरणगाव), प्रशांत पाटील (तांदलवाडी), अजय चाळसे (वरणगाव), प्रदीप वराडे (जळगाव), समाधान महाजन (विखरण)भारत आणि नेपाळच्या सीमेवरील हिमालयाच्या पर्वत रांगांत गिर्यारोहण करण्याचा अनुभव फार वेगळा आणि विशेष आहे. "The best view comes after the hardest climb" या उक्तीचा प्रत्यय संदकफू ट्रॅकदरम्यान वारंवार येतो.-रोमिंग राजपूत, गिर्यारोहक, भुसावळ