शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे १ लाख ९७ हजार रुपये जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:03 IST

निवडणूक पथकाची वाहनावर कारवाई

जळगाव / भुसावळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहन तपासणी मोहीम सुरू असून या मोहिमेत सोमवारी रात्री स्थिर स्थाई पथकाने भुसावळ येथे राष्ट्रीय महामार्गावर वरणगाव नाक्यावर एका हॉटेलजवळ कारमधून एक लाख ९७ हजार ५०० रुपये जप्त केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी सुरू असून त्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले आहे. सोमवारी रात्री भुसावळ येथे पथक प्रमुख एम. आर. दुसाने, तालुका पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार पद्माकर महाजन यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावर वरणगाव नाक्यावर एका हॉटेलजवळ वाहनाची (क्र. एम.एच. १९, बीयू ७६९५) तपासणी केली असता विलास जयराम पाटील (रा. शांतीनगर, भुसावळ) यांच्या वाहनाच्या मागील डिक्कीत १ लाख ९७ हजार ५०० रुपये आढळून आले. सदर रक्कम पथकाने जप्त केली.ही गाडी भुसावळ येथील विलास जयराम पाटील यांच्या मालकीची असून वाहन चालक ऋतुराज सिंग ठाकूर यांनी ही रक्कम ठेकेदारीतील कामगारांच्या पगारासाठी नेली होती, अशी माहिती पथकाला दिली. मात्र काही कारणास्तव पगार वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे ही रक्कम परत आणल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे. पथकाने रात्री ११.३० वाजता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना माहिती दिली. त्यानुसार त्यांनी ही रक्कम रात्री तहसील कार्यालयात जमा करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी ही रक्कम कोषागारमध्ये जमा करण्यात आली.दुसरी कारवाई६ रोजी दुपारी ४.१० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयाजवळ एका वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात ४ लाख ४० हजार रुपये आढळून आले होते. त्या रक्कमेची अद्यापही चौकशी सुरूच आहे. त्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी राष्ट्रीय महामार्गाजवळ एका वाहनात रक्कम जप्त करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव