शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

दीड कोटींची अवैध दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 11:11 IST

पाच जणांना अटक

ठळक मुद्दे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जळगाव / चाळीसगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री धुळे-औरंगाबाद रस्त्यावरील मेहुणबारे शिवारात १ कोटी ४२ लाख २ हजार ९१२ रुपये किमतीची अवैध दारु पकडली. २१ लाख रुपये किमतीच्या दोन वाहनांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांविरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक कंटेनर व कार या वाहनासह एकूण मालाची किंमत १ कोटी ६३ लाख २७ हजार ९१२ रुपये आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.असलम अली खान (रा.मजालगड, ता.पुन्हाना, जि.मेवत, हरियाणा), मोहम्मद समीम अब्दुल गफुर (रा.जमालगड, ता.पुन्हाना, जि.मेवत,हरियाणा), रवींद्र हिंमतसिंग पावरा (रा.माळ, ता.धडगाव, जि.नंदूरबार), खुशीरद सरीफ खान (रा. जलालपुर,ता.हथील, जि.पलवल, हरियाणा) व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.त्यातील अल्पवयीन मुलगा वगळता चौघांना बुधवारी न्यायालयाने ८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.परराज्यातील दारू चाळीसगावीकोट्यवधी रुपये किमतीची परराज्यातील अवैध दारु चाळीसगाव तालुक्यात येत असल्याची गुप्त माहिती विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती.त्यानुसार विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण व प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव, धुळ्याचे अधीक्षक मनोहर अंचुळे, निरीक्षक एम.बी.चव्हाण, संजय कोल्हे, महाडिक, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, सी.एच.पाटील, वसंत माळी, आनंद पाटील, किशोर गायकवाड, सहायक दुय्यम निरीक्षक ब्राह्मणे, कॉन्स्टेबल कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, गोरक्षनाथ अहिरे, संतोष निकम, मुकेश पाटील, प्रवीण वाघ, भाऊसाहेब पाटील, सागर देशमुख व प्रकाश तायडे आदींच्या पथकाने मंगळवारी रात्री मेहुणबारे शिवारात सापळा लावून कारवाई यशस्वी केली.पंजाब ट्रान्सपोर्टचे बनावट बीलपथकाने कंटनेरसह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात धीरज ट्रान्सपोर्ट कंपनी संगरुर, पंजाब नावाचा वाहतूक परवाना व इतर कागदपत्रे सादर केली. कंटेनरमधील दारुच्या बाटल्यांवरील बॅच व बीलावरील बॅच याच्यात तफावत होती. त्यामुळे ही दारु नेमकी पंजाब मधून आली की हरियाणातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका कंपनीच्या ७५० मिलीच्या १८ हजार बाटल्या तर दुसऱ्या कंपनीच्या २४ बाटल्या दीड हजार खोक्यांमध्ये आढळून आल्या. कार क्र.एच.आर.९३-२२१३ व कंटेनर क्र.एच.आर.७४-७३४६ हे दोन वाहने जप्त करण्यात आले आहेत. दारूचे नमुने घेण्यात आल्याची माहिती अधीक्षक सुधीर आढाव यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी