शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत येथे युवकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:40 IST

कर्जत येथील एका १७ वर्षाच्या मुलासोबत विहिवाता पळून गेल्याचा राग मनात धरून त्या युवकाचा काटा काढण्यात आला. जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच झाल्याचे घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : तालुक्यातील कर्जत येथील एका १७ वर्षाच्या मुलासोबत विहिवाता पळून गेल्याचा राग मनात धरून त्या युवकाचा काटा काढण्यात आला. जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच झाल्याचे घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कर्जतजवळच राजपूतवस्ती आहे. या वस्तीतच राहुल खोकड वय १७ हा राहत होता. याच दरम्यान त्यांच्याच नात्यातील एका विववाहीतेने त्याला फूस लावून गुजरातला तीन महिने पळवून नेले होते. तीन महिन्यानंतर हे दोघेजण कर्जत येथे घरी आल्यावर विवाहीतेच्या नातेवाईकांनी राहुलच्या विरोधात तक्रार दिली. मात्र नंतर ही तक्रार मागे घेत दोन्ही बाजूंकडील नातेवाईकांमध्ये समेट घडली.या नंतर राहुल खोकड याने कर्जत सोडून देऊन जालन्यात एका कंपनीत करत होता. २५ जून रोजी तो रात्री त्याच्या कर्जत येथील घरी गेला असता. २६ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास विवाहितेच्या दोघा दिरासह विवाहितेच्या सासूने राहुलला त्याच्याच घरात घसून दरवाजा लावून लोखंडी रॉड तसेच काठीने जबर मारहाण केली.यावेळी राहुलेचे आई-वडिल हे सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करून बाजूला ढकलून दिले. या मारहाणीच्या घटनेने परिसरातील शेतात काम करणारे राहुलचे अन्य नातेवाईकही घराजवळ आले होते. मात्र कडी लावल्याने दरवाजा बंद होता. ही मारहाण एवढी जबर होती की, राहुलच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता. शेवटी धरमसिंग बमनावत यांनी माराहाण सुरू असलेल्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी राहुल जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने बैलगाडीने कर्जत आणि नंतर रिक्षाने अंबड येथे आणले. परंतु तो गंभीर जखमी असल्याने त्याला जालन्याच्या एका खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले. तेथेही त्याला दाखल करून घेतले नाही. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी राहुलची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून त्याला औरंगाबादेतील घाटी रूग्णालयात नेण्याचे सांगितले. घाटीत नेत असतानाच राहुलचा वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती घाटीतील वैद्यकी अधिकाºयांनी दिली.घाटीतच राहुलचे शवविच्छेदन करण्यात आले. एका खाजगी वाहनातून त्याचे पार्थिव नातेवाईकांनी कर्जतला न नेता ते थेट अंबड येथील पोलीस ठाण्यात आणले. जो पर्यंत राहुलच्या मारेकºयांना अटक होणार नाही, तो पर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा पवित्रा घेतल्याने बुधवारी दुपारी अंबड पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती.यावेळी पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर व त्यांच्या सहकाºयांनी मध्यस्थी करून एका संशयितास ताब्यात घेतल्याचे सांगितल्यावर राहुलच्या नातेवाईकांनी येथून काढता पाय घेतला.या प्रकरणी राहुल खोकडच्या आई जमनाबाई खोकड यांच्या तक्रारीवरुन ढवळाबाई मंच्छाराम खोकड, पूनम मंच्छाराम खोकड व रमेश मंच्छाराम खोकड या तिघांविरुध्द भादंवि ३०२, ४५२ व ३४ नुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम. शेख करत आहेत.एकूणच या सर्व प्रकारामुळे कर्जत तसेच अंबड येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस