परतर शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना मंगळवारी परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहतूक नियमासंबधी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वाहन निरीक्षक ओ. एस. कातोरे हे बोलत होते. वाहनांची संख्या वाढत असल्याने अपघात वाढले आहेत. यातच वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, गतीने व मद्य प्राशन करून वाहने चालवणे, अल्पवयीन मुलांनी वाहने भरधाव वेगाने चालविणे यातून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवून, वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास निश्चित अपघातांचे प्रमाण कमी होईल, असेही कातोरे म्हणाले. यावेळी वाहन निरीक्षक ए. एम. भातलोंढे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक व्ही. डी. सवने, उपमुख्याध्यापक एस. के. वायाळ, वाहन निरीक्षक ए. एस. भातलोंडे, टी. जी. घुगे, बालाजी ढोबळे, सुरेश वावरे, विरष्ठ लिपीक वैजनाथ तनपुरे, प्रभाकर मस्के यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
युवकांनी वाहतूक नियम पाळावेत: कातुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST