दरम्यान कोरोना प्रतिबंधक लस घेल्यावर कितान २८ दिवस रक्तदान करता येत नसल्याचाही परिणाम रक्तदानावर पडल्याचे सांगण्यात आले.
---------------------------------------------------
हत्तीरिसाला मिरवणूक यंदा नाही : राऊत
जालना : जालना शहरात धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी बारा वाजता हत्तीरिसाला मिरवणूक काढण्याची गेल्या १३२ वर्षापासूनची पंरपरा आहे. परंतु यंदा कोरोनामुळे ही मिरवणूक रद्द करण्यात आल्याची माहिती हत्तीरिसाला उत्सव समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव राऊत यांनी केले आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या पत्रकावर समितीचे कार्याध्यक्ष सुभाष देविदान, रमेश गौरक्षक, दिगंबर पेरे, गोविंद गाजरे, सूर्यकांत पवार, हिरालाल पिपरिये, अंकुशराव देशमुख, विठ्ठल शिर्के, रामदास जाधव, ओमकुमार भारूका हरिप्रसाद देविदान, ओमप्रकाश भिसे आदींची नावे आहेत.
--------------------------------------------------
केदारोड्यात बाजार भरण्यास मज्जावच
जालना : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे दोन दिवसांपूर्वी आठवडी बाजार भरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली या बद्दलचे वृत्त प्रसिध्द झाले होते. परंतु त्यात तथ्य नसल्याची माहिती केंदारखेडा येथील सरपंच सतीश शेळके यांनी दिली आहे.
केदारखेडा ग्रामपंचायतीने कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून या आधीच नोटीस काढून आठवडी बाजार बंद ठेवण्याचे कळविले होते. त्यामुळे केदारखेडा येथे हा बाजार भरला नव्हता. केदारखेड्यापासून जवळून जाणाऱ्या रस्त्यालगत काही शेतकऱ्यांनी त्यांचा भाजीपाला तसेच अन्य साहित्य विक्रीसाठी आणले होते. त्यामुळे तो त्यांनी विकला असावा.
यातून केदारखेडा ग्रामपंचायतीने कुठल्याच आदेशाचे उल्लंघन केले नसल्याचेही सरपंच शेळके म्हणाले. केदारखेडा येथील उपसरपंच पंडित जाधव, ग्रामसेविका के.एल. रोकडे यांनी देखील सरपंचांच्या भूमिकेला पाठिंबा देऊन आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी तसेच अन्य वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून त्यांचा आदर करत असल्याचेही सांगण्यात आले.