शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

‘गझल’चा वारसा तरूण पिढी समर्थपणे जपतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:34 IST

तरूण पिढी ताकदीचे गझल लेखन करून गझल वारसा समर्थपणे जपत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार दास पाटील यांनी मंगळवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कवी सुरेश भटानंतर शिथिलता आलेल्या ‘गझल’ची सोशल मीडियामुळे व्यापकता वाढली असून, तरूण पिढी ताकदीचे गझल लेखन करून गझल वारसा समर्थपणे जपत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार दास पाटील यांनी मंगळवारी केले.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा जालना आणि जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गझल कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ‘ते’ बोलत होते.यावेळी उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. जवाहर काबरा हे उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राव साहेब ढवळे, प्रसिद्ध गझलकार मसूद पटेल, चित्रपट कथा लेखक चेतन सैंदाने, डॉ. राज रणधीर, डॉ. पंडित रानोमाळ, डॉ. के. जी. सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.पाटील म्हणाले, गझल, काव्यातून क्रांती घडवून आणली जाते, हे इतिहास दर्शवितो. गझल ही आपल्या जीवनाशी निगडित असते. गझलमुळे जीवन व्यापक होते. व्याकरण आणि तंत्र सांभाळून गझल लेखन करायला पाहिजे, शिवाय गझल लेखन करताना आशय, अचूकता व प्रभावीरीत्या विषयाची मांडणी करणे गरजेचे आहे. सोशल मीडियामुळे गझल लोकप्रिय होत आहे. नवीन पिढीतील गझलकार ताकदीचे गझल लेखन करताना दिसत आहेत. इंद्रजित उगले, अजय त्रिभुवन, सुरेश यलगुडे, सांबरे आदी गझलकार ताकदीचे गझल लेखन करीत आहेत.गझलकार मसूद पटेल यांनी गझल ही अर्थपूर्ण आणि प्रभावी असावी, असे सांगून गझलचा वारसा समर्थपणे जपण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे, असे आवाहन केले.प्रारंभी प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांच्या हस्ते वृक्ष जलदान करून या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. संशोधन परिषद शाखेचे सचिव डॉ. पंडित रानमाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

टॅग्स :literatureसाहित्यSocial Mediaसोशल मीडिया