शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीसाठी तरुणांनी मतदानात सहभाग नोंदवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:45 IST

तरुण व नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम, शक्तिशाली लोकशाही राष्ट्र उभारणीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी गुरुवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तरुण व नवमतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात वेळीच मतदार नोंदणी करुन लोकशाही सुदृढ व सक्षम करण्यासाठी हातभार लावावा. तसेच मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम, शक्तिशाली लोकशाही राष्ट्र उभारणीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी गुरुवारी येथे केले.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.व्यासपीठावर पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार बिपीन पाटील आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० या दिवशी झाल्याने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा मतदार दिन साजरा करण्यामागे मुख्य हेतू आहे.पोलीस अधीक्षक पोकळे म्हणाले की, तरुणांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन समृद्ध व सशक्त अशा लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा.यावेळी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील रौप्यपदक विजेते किशोर डांगे पोलीस दलातील कर्मचारी यांना तरुणांसाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले होते. प्रास्ताविक राजेश जोशी यांनी केले.जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.