शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

युवकाचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:27 IST

एका २४ वर्षीय युवकाचा दगड, लाकडी फळीने ठेचून खून केल्याची घटना पारध (ता.भोकरदन) शिवारात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपारध : एका २४ वर्षीय युवकाचा दगड, लाकडी फळीने ठेचून खून केल्याची घटना पारध (ता.भोकरदन) शिवारात घडली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली असून, याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयत युवक हा मासरूळ (जि.बुलडाणा) येथील आहे.पारध येथील प्रभू दामू सुरडकर हे शुक्रवारी सायंकाळी शेतातून घरी येत होते. त्यावेळी श्रीरंग दगडू सुरडकर यांच्या शेतातील बांधावरील एका झाडाखाली त्यांना एका युवकाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पारध पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पो.ना. नारायण माळी, प्रकाश सिनकर, पो.हे.कॉ. गीते यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.दोन युवकांनी बोलावून नेलेस्वप्नील शुक्रवारी पंढरीच्या वारीवरून गावाकडे परतला होता. जेवणानंतर तो शेतात गेला. दुपारच्या सुमारास दुचाकीवर घरी आलेल्या दोघांनी स्वप्नीलची विचारपूस केली. ‘पारध येथील कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्यायचे आहे. त्याची कॉलेजमध्ये ओळख असल्याने त्याला घेण्यासाठी आल्याचे सांगत शेतातून स्वप्नीलला सोबत नेल्याचे नातेवाईकांनी सांगितले.चार संशयित ताब्यातमासरूळ येथील युवकाच्या खून प्रकरणात पारध पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात पारध (ता. भोकरदन) येथील एक, वालसावंगी (ता. भोकरदन) येथील एक आणि चांदई (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील दोघांचा समावेश आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी