शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील तरुणाला शहागड येथे जिवंत जाळले; आर्थिक व्यवहारात घातपात झाल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 12:45 IST

बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

ठळक मुद्देअनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.अनंत हा वासनवाडी  (ता.जि. बीड) च्या ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करत असे.

शहागड ( जालना ) : बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान  शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अनंत हा वासनवाडी  (ता.जि. बीड) च्या ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करत असे. तसेच खाजगीत तो पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड आदी तो काढून देण्याचे काम करायचा.  काही दिवसांपूर्वी त्याने पार्टनरशिप मध्ये हायवा ट्रक घेतला होता, आणि तो मुंबईत चालवण्यासाठी दिला होता. यासोबतच त्याने बँकींग ची परिक्षा देण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादला खासगी क्लाॅस लावला होता. यासाठी तो औरंगाबाद येथेच भाड्याच्या घरात राहत होता.

मध्यरात्री घडली घटना शहागड जवळील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना च्या वाॅचमनने गोंदी पोलिसांना मध्यरात्री १.३० च्या दरम्यान एक मृतदेह येथील रस्तावर जळत असल्याची माहिती दिली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. यावेळी मृतदेह जळत होता, तो विझवण्याचा पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक विकास कोकाटे, सहाय्यक फौजदार सय्यद नासेर यांच्या सहकार्याने प्रयत्न केले मात्र ते व्यर्थ ठरले.तसेच मृताचे हात पाय तारेने बांधलेले होते अशी माहिती सोनुने यांनी दिली. मृतदेहाजवळ अर्धवट जळालेले पाॅकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, एटीएम कार्ड, काही पैसे व अन्य कागदपत्रे आढळून आले.  

घातपात बाबत दिली होती मित्राला कल्पनारविवारी औरंगाबादहून बीडकडे येत असताना रात्री १२ वाजेच्या दरम्यान मित्र नवनाथ चव्हाण याने त्याला काॅल केला होता. तेव्हा आम्ही पाचोड जवळच्या ढाब्यावर जेवत आहोत, आणि माझ्या जिवाला धोका आहे, असे म्हटल्यााचे नवनाथ याने सांगितले.

भावास रात्री १२.४५ ला केला एसएमएसअनंत ने घटना घडण्यापूर्वी पुणे येथे इंजिनिअर असलेल्या गोविंद इंगोले ला मोठ्या भावास एसएमएस केला होता. यात धुमाळ व अन्य एक माझ्या सोबत आहेत, आणि 21 लाख रुपये मला येणे आहे, असे एसएमएस मध्ये नमूद केले होते.