शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:58 IST

जालना-मंठा मार्गालगत डुकरीपिंपरी शिवारात एका विहिरीत गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह शनिवारी दुपारी आढळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कविरेगाव : जालना-मंठा मार्गालगत डुकरीपिंपरी शिवारात एका विहिरीत गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह शनिवारी दुपारी आढळून आला. बंडू उर्फ नन्नू मुरलीधर शिंदे (३५,रा. हडपसावरगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृतदेह पूर्णपणे कुजल्यामुळे ही आत्महत्या की घातपात, असा संशय स्थानिकांमधून व्यक्त केला जात आहे.परिसरात दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता, एका कोरड्या विहिरीत लिंबाच्या झाडाला दोर बांधून एका व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत नागरिकांनी मौजपुरी पोलिसांना माहिती दिली. सपोनि मनिष पाटील हे घटनास्थळी पोहचले. पंचनामा करताना मृत व्यक्तीच्या खिशात सीमकार्ड आढळून आले. पोलिसांनी हे सीमकार्ड मोबाईलमध्ये टाकून परिसरातील काही व्यक्तींच्या क्रमांकावर संपर्क केला. तेव्हा हा क्रमांक बंडू शिंदे यांचा असल्याची माहिती मिळाली. शिंदे यांच्या पाठीवर खरचटलेले असून, शरिरावर जखमा आहेत.मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने तीन-चार दिवसांपूर्वी ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मौजपुरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.