शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संत जगनाडे महाराजांचे कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:40 IST

जगतगुरू संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराजांची गाथा लिहून काढणारे श्री संत जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जगतगुरू संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराजांची गाथा लिहून काढणारे श्री संत जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. म्हणून प्रत्येकाने त्यांच्या कार्याचे अनुकरण करून आपले जीवन सुखकर करावे, असा हितोपदेश हभप. भगवान महाराज आनंदगडकर यांनी दिला आहे.श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची गुरूवारी ३१९ व्या पुण्यतिथी निमित्त तेली समाजाच्या वतीने विविध उपक्रमांनी त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त समाजाच्यातर्फे कन्हैयानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात प. पू. भगवान महाराज आनंदगडकर बोलत होते.प्रारंभी सकाळी ९ वाजता मोदीखाना भागातील तेली पंचायत वाडा येथून संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस रथामध्ये विराजमान करण्यात आले. त्यानंतर रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. ही रथयात्रा शहरातील मोदीखाना, आर. पी. रस्ता, नेहरु रस्ता मार्गे काद्राबाद, नळगल्ली, पाणी वेस येथून पंचमुखी महादेव मंदिराच्या प्रांगणात विसर्जित करण्यात आली.श्री संत जगनाडे महाराजांची रथ यात्रा रस्त्यावरुन मार्गस्थ होणार असल्याने समाजातील सुवासिनींनी आपापल्या घरासमोर सडा रांगोळ्यांसह फुलांची उधळण करुन मार्ग सजविलेला होता. रथयात्रेसोबत वेद शाळेचे विद्यार्थी टाळ- मृदंगाच्या सुमधूर आवाजात भक्तिगीते गात होती.या रथयात्रेचे खास आकर्षण हे विद्यार्थी ठरले होते. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिकcommunityसमाज