शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे - बिनवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:55 IST

निवडणुका निर्भय व नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी दक्षपणे काम करावे. तसेच निवडणुका निर्भय व नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जि.प.च्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसेय्यै, निवडणूक निर्णय अधिकारी शशीकांत हदगल, भाऊसाहेब जाधव, प्रदीप कुलकर्णी, गणेश निºहाळी, शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली थोरात, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडुळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, निवडणुकीच्या कामासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्त अधिका-यांनी त्यांना दिलेले काम चोखपणे पार पाडावे. सर्व अधिका-यांच्या कामाचा अहवाल विहित नमुन्यात सादर करावा. निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्राची पाहाणी करण्यात यावी.दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आयोगाने निर्देश दिले असून, त्यादृष्टीने सर्व सुविधा दिव्यांगांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.जिल्ह्यातील खाजगी व शासकीय होर्डिंगवर असलेले बॅनर्स तातडीने हटविण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना