शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day Special : बाईंच्या कष्टाला ‘कृषिभूषण’ लगडलं ! : छायाबाई दत्तात्रय मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:10 IST

महिलांना संधी दिली तर शेतीतूनही प्रगती शक्य

- संजय देशमुखजालना : माहेरी शेती असतानाही कधी काम केले नाही. पण, सासरी आल्यावर कुटुंबाला हातभार लावला पाहिजे, या विचाराने त्या शेतीत उतरल्या. संघर्ष हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेला असतो. हे कळलेल्या ‘बाई’ने शेतीत झोकून दिले. कष्टाचे चीज झाले म्हणतात, पण जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील छायाबाई दत्तात्रय मोरे यांच्या कष्टाला ‘कृषिभूषण’ पुरस्काराचे फळ लगडले!

१९८४ पासून शेतीत रमलेल्या कृषिभूषण छायाबाई मोरे म्हणाल्या, शेती ही एकच इंडस्ट्री अशी आहे ज्यात मूठभर टाकले की, पोते भरून मिळते. शेतीतून प्रगती साधायची असेल, तर महिलांना संधी आणि हक्क दिले पाहिजेत. शेती करताना मजूर मिळणे अवघड झाले आहे. कधी शेतात गडी आला नाही, तर महिला पदर खोचून कामाला लागतात. माहेरी असेपर्यंत मी कधी शेतात गेले नाही. लग्नानंतर मात्र कुटुंबाच्या भल्यासाठी शेतात काम करायला सुरुवात केली. पती दत्तात्रय मोरे यांनी वेळोवेळी भक्कम पाठिंबा दिला. त्यामुळेच शेतीतून प्रगती साधता आली. आज मजूर मिळत नसल्याने यांत्रिकीकरणावर भर देते. फवारणी करताना अडचण नको म्हणून कपाशीची लागवड केली. त्यातून मिनी ट्रॅक्टर जाईल अशा पद्धतीनेच ही लागवड केली. पाण्याचे महत्त्व ओळखून अन्य पिके असो की, फळबागा दोन्ही ठिबक पद्धतीनेच केली जातात, असे शेतीतील यशस्वीतेचे गणित छायाबाई सांगत होत्या. आता छायाबार्इंकडे बघून त्यांची नात अंकितादेखील शेतीत रमली आहे. तिलाही शेतीतच करिअर करायचे आहे. आपल्या शेतीचे हे फलित असल्याचे छायाबाई अभिमानाने सांगतात.

...तर शेती फायद्याची ठरेलमहिलांच्या हाती शेतीचे व्यवहार द्यायला हवे. त्यामुळे शेती निश्चितच फायद्याची ठरेल. हे पटवून देण्यासाठी छायाबार्इंनी महिला बचत गटाचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, महिलांनी छोट्या-छोट्या उद्योगांसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची टक्केवारी ही पुरुषांनी घेतलेल्या कर्जफेडीच्या कितीतरी पट जास्त आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणायलाच नको. संघर्षातून पुढे जाणाराच हिंमतवाण असतो, असे छायाबाई म्हणाल्या.

अन् मोदींनीच पतीला बोलावून घेतलेगुजरातमधील गांधीनगर येथे दोन वर्षापूर्वी एका समारंभात माझा पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांच्या हस्ते सत्कार होणार होता. पुरस्काराच्या वेळी पोलिसांनी मला एकटीलाच व्यासपीठावर सोडले. त्यामुळे मी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. मोदींनी याचे कारण विचारले. माझ्या हाती शेतीचे व्यवहार देणाऱ्या माझ्या पतीला हा पुरस्कार घेण्यासाठी बोलवावे, अशी विनंती मी केली. मोदींनी स्वत: पतीला बोलावले. तो क्षण कायमचा मनावर कोरला गेलाय, असे त्या सांगतात.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाJalanaजालना