शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

पुरुषांपेक्षा महिलांची संख्या उमेदवारीत वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST

जालना : तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या वरचढ आहे. पुरुष उमेदवारांची संख्या ...

जालना : तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या वरचढ आहे.

पुरुष उमेदवारांची संख्या ५६७ तर महिला उमेदवारांची संख्या तब्बल ८६४ एवढी आहे. सध्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिलांना पुढे करत भविष्यात पतीराज तर निर्माण होणार नाही ना? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

जालना तालुक्यात होऊ घातलेल्या ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये श्रीकृष्णनगर ग्रामपंचायतीचे सर्व टप्पे रद्द झाले असून, आता प्रत्यक्षात ८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यात तांदूळवाडी खुर्द, तांदूळवाडी बुद्रुक, नसडगाव आणि घोडेगाव या गावांचा समावेश आहे. तालुक्यात निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या २७० असून, यासाठी ७३१ जागा आहेत. याच जागांसाठी तब्बल १ हजार ४३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पैकी ८६४ हा महिला उमेदवारांचा आकडा आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने पॅनल प्रमुखांसाठी बुचकाळ्यात टाकणारा हा निर्णय आहे. असे असले तरी गावातील प्रभागांमधील सदस्यांची संख्या लक्षात घेऊन सरपंचपद कशा पद्धतीने आरक्षित राहील, याचे अंदाज बांधून पॅनलप्रमुख भूमिका बजावत असल्याचे पहावयास मिळत आहे. तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तब्बल ३१४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. परंतु, निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष ८६४ महिला आहेत. याची टक्केवारी ६० टक्क्यांवर जात आहे. तर निवडणुकीच्या रिंगणात पुरुष उमेदवारांची संख्या ५६७ (४० टक्क्यांच्या जवळपास) आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने तहसील प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, परिविक्षाधीन तहसीलदार शीतल बंडगर, तहसीलदार तुषार निकम, नायब तहसीलदार निवडणूक दिलीप सोनवणे, मनुष्यबळ व्यवस्थापनाचे जी. एल. सर्वे, अनिल पाटील, संदीप गाढवे, विश्वास भोरे, संदीप डोंगरे, पी. एस. रायमल, कल्याण गव्हाणे आदी काम करीत आहेत.

या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार

जालना तालुक्यातील सिरसवाडी, रोहनवाडी, हिस्वन बुद्रुक, पिरकल्याण, नसडगाव, सावंगी तलाव, पळसखेडा, काकडा, जळगाव, खनेपुरी, जामवाडी, बेथलम, वडीवाडी, तांदुळवाडी बुद्रुक, निरखेडा, विरेगाव, तांदुळवाडी खुर्द, पाथ्रुड, घेटोळी, सोनदेव धारा, वानडगाव, वडगाव पत्रा- तांडा, इंदेवाडी, शिवणी, लोंढेवाडी, इस्लामवाडी, हिवर्डी, बोरगाव, बाजिउम्रद, शंभू सावरगाव, वरखेड- नेर, पोखरी शिंगाडे, भिलपुरी- खुर्द, मानेगाव, देवमुर्ती, रेवगाव, बापकळ, उटवद, थेरगाव, घोडेगाव, मौजपुरी, चितळी- पुतळी, माळशेंद्रा, ममदाबाद, गोलापांगरी, बठाण- बुद्रुक, उखळी- शिवनगर, खरपुडी- गोकुळ नगर, दहीफळ, वखारी, कोळवाडी- दरेगाव- नेर, कचरेवाडी, भाटेपुरी- हिवरा- रोषणगाव, हातवन- दुधना काळेगाव हस्ते, पिंपळगाव, धानोरा, धांडेगाव, वंजार उमरद, गोंदेगाव, गुंडेवाडी, कुंभेफळ, निधोना, श्रीकृष्णनगर, पारेगाव, घाणेवाडी, सारवाडी, हिस्वन खुर्द, पुणेगाव, निपाणी, पोखरी, कडवंची, दरेगाव, धारकल्याण, पाचनवडगाव, डांबरी, सोमनाथ, पोकळवडगाव, सिंधीकाळेगाव, माळेगाव खुर्द, कारला, सेवली, वझर, अंतरवाला, सामनगाव, राठोडनगर या गामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.