शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बालकाचे अपहरण करणारी महिला ताब्यात, बाळ सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 08:55 IST

परभणी जिह्यातील सेलू येथून महिलेला बाळासह ताब्यात घेतले

जालना : शहरातील गांधीचमन येथील महिला रूग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली होती. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीचे फुटेज बारकाईने तपासले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्रभर शोध घेतला. त्यानंतर आज पहाटे परभणी जिह्यातील सेलू येथून एका महिलेला बाळासह पोलिसांनी ताब्यात घेतले.बाळ सुखरूप असून, त्याच्यावर महिला रुग्णालयात उपचार सुरू आहे.  

अफरिण जाफर शेख( 22 रा. परभणी) असे महिलेचे नाव आहे. बाळ होतं नसल्याने बाळा चोरल्याची कबुली महिलेने दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना तालुक्यातील पारेगाव येथील रहिवासी शेख रूक्साना अहमेद या महिलेची प्रसुती रविवारी रात्री झाली. तिला मुलगा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुल आणि बाळांतीन सुखरूप होते. संबंधित मुलाचे अपहरण करणारी संशयित महिला ही देखील रात्रीपसून रूग्णालयात असल्याचे शेजारील महिलांनी सांगितले. या मुलाला उन्हात घेऊन जावे असे रूग्णालयातील स्टाफने सांगितले. त्यामुळे त्या महिलेने मुलाला घेऊन रूग्णालयाबाहेर गेली. ती परत आलीच नाही.

बाळांतीन महिला ही, थोडी मतिमंद असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याच संधीचा लााभ घेऊन संबंधित बुरखाधारी महिलेने मुलाचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले होते. नवजात मुलाचे अहपरण झाल्याचे कळताच एलसीबीचे निरीक्षक सुभाष भुजंग, कदीम ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी महिलेला सेलू येथून बाळासह ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना