शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षाच्या मुलीसह आईची विहिरीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:59 IST

भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रूक येथे आई व तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. ही आत्महत्या आहे की, घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रूक येथे आई व तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. ही आत्महत्या आहे की, घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही.रविवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान पारध बुद्रूक येथील शेतकरी सतीश देशमुख हे त्यांच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या भुडकी नावाच्या शेतातील विहिरीत एक महिला व लहान बाळाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आदळला . देशमुख यांनी तात्काळ पारध पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे स.पो.नि.सुदाम भागवत आणि पो.कॉ. प्रशांत उबाळे, सुरेश डुकरे ,वाघ,जाधव आणि सरदार या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व येथे जमलेल्या काही ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील दोन्ही मृतदेह बाहेर काढले. सदरील दोन्ही मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. ही घटना परिसरात वा-यासारखी पसरली. परिसरातील सावंगी अवघडरव येथील ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. त्यापैकी शंकर पायघन रा.सावंगी अवघडराव यांनी हे दोन्ही मृतदेह ओळखले आणि सदरची महिला मयत सुनीता शंकर पायघन (वय २८) ही माझी पत्नी असून आरती (३ वर्ष) ही आपली मुलगी असल्याचे पोलिसांना सांगितले.पोलिसांनी मृतदेह वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल केले. या घटनेचा तपास पोलीस सर्व बाजूंनी करत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस