शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:32 IST

रेल्वेस्थानक, अंबड चौफुली, शिवाजी पुतळा या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था आहे. त्यामुळे या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ? असा प्रश्न उद्भवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील काही रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले, तर रेल्वेस्थानक, अंबड चौफुली, शिवाजी पुतळा या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था आहे. त्यामुळे या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ? असा प्रश्न उद्भवत आहे.शहरातील अत्यंत महत्वाचा असा भाग रेल्वेस्थानक रस्ता काँक्रिटीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शहरातंर्गत अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर मंमादेवी ते रेल्वेस्थानक, सतकर कॉम्पेलक्स ते अंबड चौफुली या खड्डेमय रस्त्याचे भाग्य कधी उजळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा न्यायालय या महत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी मंमादेवी ते रेल्वेस्थानक, व सतकर कॉम्पलेक्स ते अंबड चौफुली हे महत्वाचे मार्ग आहे. मात्र त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रेल्वेतून येणाऱ्या अभ्यागतांना या खड्डेमय रस्त्याचे दर्शन घडते, ही बाब जालना शहरासाठी दुर्दैवी म्हणावी लागते. शहरातील अनेक नागरिकांनी मंमादेवी मंदीर ते रेल्वेस्थानक, सतकर कॉम्पलेक्स ते अंबड चौफुली या रस्त्याचे काँक्रिटीकरण करुन त्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी केली आहे.तर अंबड चौफुली, मंमादेवी मंदिरापासून सुरु होणारा सदर रस्ता ८० फुटांचा आहे. एवढा मोठा रस्ता असला तरी आजमितीला तो अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.याकडे नगर पालिकेने लक्ष देण्याची गरज असून, या रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.नगरपालिकेने लक्ष देण्याची गरजया रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.परंतु, हेच दोन रस्ते बाकी असल्याने याकडे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पालकमंत्री बबनराव लोणीकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लक्ष घालून या रस्त्याचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, अनेक वेळा शहरातील नागरिकांनी नगरपालिकेला रस्ता दुरुस्तीबाबत निवेदने दिली आहे. परंतु, जालना नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागJalana Muncipalityजालना नगरपरिषद