शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने केला पतीचा खून; लोखंडी वस्तूने डोक्यात वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 14:01 IST

संपत्तीच्या वादातून खून झाल्याचा पोलिसांना संशय

अंकुशनगर (जालना) : एका महिलेने पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील महाकाळ (जि.जालना) येथे घडली. ही सोमवारी पहाटेच्या सुमारास समोर आली असून, या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक जिजा मुळे (६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.महाकाळ येथील माणिक जिजा मुळे यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांची पहिली पत्नी सत्यभामा या माहेरी गेल्या होत्या. तर माणिक मुळे व त्यांची दुसरी पत्नी शारदा हे दोघे रविवारी रात्री घरात झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास पतीला कोणीतरी माणसे मारत असल्याचे सांगत शारदा मुळे या गावचे पोलीस पाटील राजेंद्र कव्हाळे यांच्याकडे धावत गेल्या. कव्हाळे व इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता माणिक मुळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचरण करण्यात आले. मात्र, माग काढण्यासाठी श्वानाला कोणतीही वस्तू आढळली नाही. घराचे दरवाजे, कड्या तुटलेले आढळून न आल्याने हा बनाव असल्याचा संशय घेत पोलिसांनी शारदा मुळे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच शारदा मुळे यांनी आपण पतीच्या डोक्यात अवजड वस्तूने वार करून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मयताची पहिली पत्नी सत्यभामा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शारदा मुळे यांच्याविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि हनुमंत वारे हे करीत आहेत.संपत्तीच्या वादातून केले कृत्यमहाकाळा येथील माणिक जिजा मुळे यांना गावच्या शिवारात १२ एकर शेती आहे. लग्नानंतर त्यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पहिल्या लग्नाच्या पंधरा वर्षानंतर दुसरे लग्न केले. मात्र, तरीही त्यांना मूलबाळ झाले नाही. दोन लग्नानंतरही मूलबाळ होत नसल्याने एखादे मूल दत्तक घेण्याची चर्चा माणिक मुळे करत होते. त्यामुळे संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Murderखून