शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

पत्नीवर अत्याचार करून ऑडीओ क्लिप व्हायरल; बदनामीच्या भीतीने पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2022 15:34 IST

बदनामीच्या भेटीने पतीने केली आत्महत्या

भोकरदन (जालना) :  पत्नीवर अत्याचार करून तिच्यासोबत बोलण्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने बदनामीच्या भीतीने पतीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे घडली. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिलांनी पीडीतेला रवी दत्तात्रय सपकाळ यांच्याशी फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. शिवाय तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यात आले. या सगळ्या प्रकारानंतर पीड़ित महिला आणि संबंधित संशयित आरोपी तरुण यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पीडीत महिलेच्या पतीला पाठवल्या. त्यामुळे बदनामी झाल्याच्या समजातून पीड़ित महिलेच्या पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. 

याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पारध पोलीस ठाण्यात गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिला विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे बलात्कार, विनयभंग आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि रत्नदीप जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेकर करीत आहेत. मात्र  पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना