शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

पाच लाखांची लाच घेताना  कृषी अधिका-याला अटक,  अन्य तिघेही ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 21:29 IST

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जाणाºया झाडांचे मूल्यांकन वाढवून देण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकाणाºया तालुका कृषी अधिकाºयांसह तीन खाजगी व्यक्तींना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. शहरातील नूतन वसाहत भागातील उड्डाणपुलाखाली मंगळवारी दुपारनंतर ही कारवाई करण्यात आली. यातील एका संशयिताकडून एसीबीने एक रिव्हॉल्व्हर, राऊंड व कार जप्त केली आहे. 

अटक केलेल्या संशयितांमध्ये जालना तालुका कृषी अधिकारी रामेश्वर अण्णासाहेब रोडगे (४८) अनंत बाबुराव नाल्टे उर्फ माने (६८), बालासाहेब ज्ञानोबा वाघमारे (४३, सर्व रा. रवळगाव, ता. सेलू, जि. परभणी) व सुभाष गणपतराव खाडे (४०,रा. जांबसमर्थ, ता. घनसावंगी, जि.जालना ) यांचा समावेश आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराची अहंकार देऊळगाव (ता. जालना) येथील शेती समृद्धी महामार्गासाठी  संपादित झाली आहे. संपादित जमिनीवरील झाडांचे कृषी विभागाकडून तीन कोटी एक लाखांचे मूल्यांकन काढण्यात आले होते. मात्र, तक्रारदाराने उपविभागीय अधिकारी कार्यालयात जावून चौकशी केली असता, मूल्यांकन दोन कोटी सतरा लाख रुपये दाखविण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदाराने झाडांचे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. काही दिवसानंतर संशयित सुभाष खाडे हा तक्रारदारास भेटला. तालुका कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी पाठविल्याचे सांगून मूल्यांकन वाढवून देण्यासाठी २० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदाराने संशयित अनंत नाल्टे, बालासाहेब वाघमारे व सुभाष खाडे यांना पाच लाख रुपये दिले. उर्वरीत पैसे काम झाल्यानंतर देण्याचे ठरले. उर्वरीत पैशाची खात्री म्हणून तक्रारदाराकडून साडेसात लाखांचे दोन धनादेश गहाण म्हणून घेण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराच्या खात्यावर संपादित झाडांसह इतर असा सुमारे आठ कोटी रुपयांचा मोबदला जमा झाला. 

दरम्यान, तक्रारदाराच्या मुलाच्या नावावरील जमीनही समृद्धी महामार्गासाठी संपादित झाली आहे. या जमिनीवरील झाडांचे मूल्यांकन कृषी विभागाने ३९ लाख रुपये काढले. परंतु उपविभागीय कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर केवळ १६ हजार रुपयांचे मूल्यांकन काढल्याचे तक्रारदारास समजले.  पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दिल्यानंतर तक्रारदाराने अनंत नाल्टे, बालासाहेब वाघमारे व सुभाष खाडे यांच्याशी बोलणी केली. त्यांनी पूर्वीेचे १५ लाख रुपये दिले नाही तर पुनर्मूल्यांकन होणार नाही म्हणून सांगितले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीचे पडताळणी केली असता, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी उर्वरीत १५ लाख रुपये देण्यासाठी मंगळवारी भेटण्यास सांगितले. त्यानुसार लाचलुचपत विभागाने उड्डाणपुलाखाली सापळा लावला असता, संशयित अनंत नाल्टे, बालासाहेब वाघमारे व सुभाष खाडे यांना तक्रारदाराकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. बालासाहेब वाघमारे याच्याकडून पथकाने रिव्हॉल्व्हर, फायर राऊंड व कार जप्त केली. त्यानंतर  जालना तहसील कार्यालयाच्या परिसरातून तालुका कृषी अधिकारी रोडगे यांना ताब्यात घेण्यात आले.

उशिरा वैद्यकीय तपासणी

 सर्व संशयितांवर येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.