शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तूर ठेवायला कुणी जागा देता का... जागा... ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:56 IST

हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागाच नाही. आठवड्यापासून जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागेचा शोध पूर्ण झाला नाही. यामुळे आठवड्यापासून हमीभाव केंद्र बंद असल्याने नोंदणीकृत शेतकरी हवालदिल झाले आहेत.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागाच नाही. आठवड्यापासून जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागेचा शोध पूर्ण झाला नाही. यामुळे आठवड्यापासून हमीभाव केंद्र बंद असल्याने नोंदणीकृत शेतकरी हवालदिल झाले आहेत.१ जानेवारीपासून जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी करण्यास सुरूवात करण्यात आली. अडीच महिन्याच्या कालावधीत आत्तापर्यत ६ हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंद केली आहे. मात्र शासकीय गोदाम गेल्यावर्षीच्या तुरीने गच्च भरून आहेत. यामुळे सुरूवातीपासून हमीभाव केंद्रावर तूर खरेदी प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. १२ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. मात्र शासकीय गोदामात तूर ठेवायला जागाच नसल्याने १५ मार्चपासून जिल्ह्यातील आठही केंद्रावरील तूर खरेदी ठप्प झाली आहे. परिणामी नोंदणीकृत शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारत आहेत. मात्र केंद्रच ठप्प असल्याने याबाबत विचारपूस कोणाला करावी, अशी चिंता शेतक-यांना पडली आहे. त्यातच साडेतीन कोटी रूपयांची तूर खरेदी करण्यात आली. मात्र, अद्याप शेतक-यांच्या बँकखात्यात पैसे जमा होण्यास विलंब होत असल्याची खंत शेतक-यातून व्यक्त होत आहे. वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक सूर्यवंशी काही दिवसांपूर्वीच शहरात येऊन तूर ठेवण्यासाठी जागेचा शोध घेतला. जिल्हा पणन विभागाचे गोदाम भोडतत्वावर घेऊन त्यात खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी हालचाली अधिकारी स्तरावर झाल्या होत्या मात्र अद्यापही मार्केटिंग विभागाचे गोदाम खुले करण्यात आले नसल्याने जागेअभावी जिल्ह्यातील तूर खरेदी ठप्प आहे. तूर खरेदी केव्हा पूर्ववत होणार, याची आस शेतक-यांना आहे.हरभ-यासाठी ३०० शेतकºयांची नोदणीएकीकडे तूर खरेदी ठप्प असतांना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ३०० शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र तूर खरेदीच ठप्प असल्याने हरभरा खरेदी केव्हा सुरू होईल, याची शेतक-यांना उत्सुकता आहे. सध्या हमीभाव केंद्रावर १० ते १२ क्विंटल प्रति हेक्टरी हरभरा खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यात वाढ करून हेक्टरी २० ते २५ क्विंटल खरेदी करण्याची मागणी हिवर्डी येथील शेतकरी शंकर भुतेकर यांच्यासह काही शेतक-यांनी केली आहे.लवकरच तूर खरेदी...याबाबात जिल्हा मार्केटींग अधिकारी गजानन मगरे यांना विचारले असता तूर ठेवण्यासाठी भोकरदन मार्गावर असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात तात्पुरती सोय करण्यात आली असून लवकरच तूर खरेदी सुरळीत होणार आहे. सदर गोदामात ५ हजार क्विंटल तूर ठेवण्याची क्षमता असल्याचे मगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीpigeonsकबुतर