शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धनश्री मुजमुलेचे जालन्यात जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:53 IST

धनश्री मुजमुले या चार वर्षाच्या मुलीवर हृदय बदलण्याची शस्त्रक्रिया होण्याची ही महाराष्ट्रातील कदाचित पहिलीच वेळ असल्याने आमच्या सर्वांचेच हृदयाचे ठोके चुकले होते. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांनी तिच्यावरील ही अंत्यत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे कळाल्यावर आनंद गगनात मावला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : धनश्री मुजमुले या चार वर्षाच्या मुलीवर हृदय बदलण्याची शस्त्रक्रिया होण्याची ही महाराष्ट्रातील कदाचित पहिलीच वेळ असल्याने आमच्या सर्वांचेच हृदयाचे ठोके चुकले होते. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांनी तिच्यावरील ही अंत्यत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे कळाल्यावर आनंद गगनात मावला नाही. त्यामुळे धनश्री रविवारी येणार हे कळल्यावर आम्ही जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेतल्याची भावूक प्रतिक्रिया धनश्रीला हा आजार असल्याचे सांगणारे येथील  हॉस्पिटलचे डॉ. बळीराम बागूल यांनी व्यक्त केली.वयाच्या चौथ्यावर्षी एखाद्या चिमुकलीचे हृदय इतके कमकुवत असू, शकते यावर प्रारंभी विश्वास बसला नाही. परंतू धनश्री ही वारंवार सर्दी, ताप येण्यामुळे आजारी पडत असे. हे वारंवार आजारी पडण्याचे कारण शोधण्यासाठी म्हणून तिची हदयरोग तज्ज्ञाकडून तपासणी केली असता, मूळातच तिच्या हदयाचा आकार हा सर्वसामान्यांपेक्षा जास्त वाढल्याचे दिसून आले. तसेच हदयला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्याही पुरेशा ताकदीने काम करत नसल्याचे दिसून आल्याने हा आजार गंभीर असल्याचे समोर आले. त्यामुळे धनश्रीचे वडिल कृष्णा मुजमूले आणि आई कल्पना मुजमूले यांना तिचे हदय बदलावे लागणार हे सांगितल्यावर धक्काच बसला. मात्र त्यांनी हिंमत ठेवून यावर वैद्यकीय उपचार करण्याचा निर्णय घेतला. हदय हवे आहे, तशी नोंदणी औरंगाबेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये वर्षभरापूर्वी केली.दरम्यान, औरंगाबाद येथील युवक प्रतिक वाहूळकर याचा अपघात झाल्याने तो ब्रेनडेड झाल्यावर त्याच्या आई-वडिलांनी त्याचे हदय, किडनी, लिव्हर आणि डोळे दान करण्याचा निर्णय एमजीएमच्या व्यवस्थापनाला कळविला. तेथील डॉ. पंकज सुगावकर यांनी लगेचच प्रतीक्षा यादीतील धनश्रीचे वडिल कृष्णा मुजमूले यांच्याशी संपर्क साधून, हदय उपलब्ध असल्याचे सांगितले. परंतू ही शस्त्रक्रिया अंत्यत खर्चिक असल्याने मुजमूले चिंतेत पडले होते. असे असतानाच त्यांच्या मदतीला दानशूर संस्था तसेच राज्य सरकार धावून आले आणि धनश्रीवर मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हार्टट्रन्सप्लंटची शस्त्रक्रिया डॉ. अनय मुळे यांच्या टीमने यशस्वी केल्याची माहिती डॉ. बागल यांनी दिली. एकूणच ओरंगाबाद येथून वाहूळकर याचे ºहदय एअर अ‍ॅम्ब्युलन्स मुंबईत नेण्यात आले. त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून भरीव मदत मिळल्यानेच हे शक्य झाल्याचे डॉ. बागल म्हणाले. यावेळी हॉस्पिटलचे सहकारी डॉ. कैलास राजगुरू, डॉ. शिवदास निरवळ, डॉ. श्याम बागल, डॉ. राजेंद्र राख, डॉ. मिलिंद काठोळे, डॉ. अरविंद म्हस्के, डॉ. प्रितेश भक्कड, डॉ. आचल भक्कड आदींची उपस्थिती होती.स्वागतादरम्यान सर्वच जण झाले भावूकआता धनश्रीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यावर ती प्रथमच रविवारी जालन्यात आली. त्यावेळी तिचे जंगी स्वागत करण्यात आले. रांगोळ्या, फुगे, लेझीम पथक आणि केक कापून हे जोरदार स्वागत केल्याने धनश्री भावूक झाली होती. यावेळी कृष्णा मुजमूले यांनी आमच्या परिवाराला समाजातील सर्व घटकांकडून जी मदत मिळाली, त्यामुळेच माझी चिमुकली सुखरूप असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले होते.

टॅग्स :Organ donationअवयव दानMedicalवैद्यकीय