शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरील बनावट संदेशामुळे खरपुडीकर भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:40 IST

आप्तेष्टांकडून येणारे फोन आणि बनावट संदेशामुळे खरपुडीवासियांची झोप उडाली असून, गावातील व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील खरपुडी गावात संशयित रूग्ण आढळल्याचा बनावट संदेश बुधवारी रात्रीपासून व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल झाला आणि खरपुडीतील प्रत्येकाचा फोन खणखणू लागला. आप्तेष्टांकडून येणारे फोन आणि बनावट संदेशामुळे खरपुडीवासियांची झोप उडाली असून, गावातील व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.महाराष्ट्रात कोरोनाचे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. सर्वत्र कोरोना आजाराचीच चर्चा आहे. याच धर्तीवर जालना तालुक्यातील खरपुडी गावात कोरोनाचा पहिला संशयित रूग्ण आढळल्याचा बनावट संदेश विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर बुधवारी रात्री व्हायरल झाला. पाहता पाहता हा संदेश जिल्हाभरातील व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर फिरू लागला आणि खरपुडी येथील प्रत्येकाचे फोन खणखणू लागले. नातेवाईक फोन करीत असल्याने आणि बनावट संदेश फिरू लागल्याने भयभीत झालेल्या खरपुडी ग्रामस्थांनीही संदेशाची शहानिशा करण्यासाठी थेट जालना व औरंगाबाद रूग्णालयाशी संपर्क करू लागले. मात्र, खरपुडीतील कोणताही रूग्ण नसल्याचे समजल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, या बनावट संदेशामुळे गावातील व्यवहारावर परिणाम झाला. दूध घेऊन आलेल्या अनेकांकडील दूधही नागरिकांनी घेतले नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. एकूणच एका बनावट संदेशामुळे पाच हजार लोकसंख्या असलेल्या खरपुडी ग्रामस्थांची मात्र चांगलीच धांदल उडाली होती.औरंगाबाद घाटीत ‘त्या’ नावाचे डॉक्टर नाहीतव्हॉटस्अ‍ॅपवर फिरणाऱ्या बनावट संदेशात औरंगाबाद घाटी रूग्णालयातील डॉ. शिवहरी घोरपडे, असे नाव टाकून प्रतिबंधक उपाययोजना सूचित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात वरील नावाचा एकही डॉक्टर औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात कार्यरत नसल्याची माहिती घाटी रूग्णालय प्रशासनाने दिली आहे...आणि पाहुणे आलेच नाहीतगावातील एका मुलीला पाहण्यासाठी गुरूवारी पाहुणे येणार होते. पाहुणे येणार म्हणून मुलीच्या घरच्यांनी स्वयंपाकाची तयारी केली. पाहुण्यांच्या स्वागताची तयारी केली. मात्र, खरपुडीतील कोरोना संशयिताचा संदेश व्हायरल झाला आणि मुलीला पाहण्यासाठी आलेले पाहुणे आलेच नाहीत, असे सरपंच देठे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोनाHealthआरोग्यSocial Viralसोशल व्हायरल