शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांना वठणीवर आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:19 IST

पीकविमा कंपन्या आणि बँकांना वठणीवर आणण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. सत्तेत असतानाही शिवसेना कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे आता पीकविमा कंपन्या आणि बँकांना वठणीवर आणण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले. शनिवारी जालना येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.येथील जालना जिल्हा शिवेसेनेच्या वतीने पीकविमा संदर्भात शेतकऱ्यांकडून तक्रार अर्ज भरून घेतले जात आहेत. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. जालना येथील तक्रार निवारण केंद्राला रामदास कदम यांनी शनिवारी सकाळी भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले, एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. या रोखल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी हातचलाखी न करता पीकविम्याचे वाटप करावे. आगामी काळात बँका आणि पीकविमा कंपन्यांनी शेतक-यांचे हित न जोपासल्यास त्यांना धडा शिकविला जाईल. महाराष्ट्रात २४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. परंतु, काही बँकांनी कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करत नसल्याचे कदम यांनी सांगितले.यावेळी प्लास्टिक बंदीबद्दल कदम म्हणाले, प्लास्टिकपासून होणा-या कच-याचे प्रमाण ५० टक्के घटले आहे. आगामी काळात आणखी कठोर निर्णय याविषयी घेणार आहोत. दूध पॅकिंगसाठी महाराष्ट्रात दररोज एक कोटी प्लास्टिकच्या पिशव्या लागतात. याबद्दलही लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही कदम यांनी सांगितले. या कार्यक्रमास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिहर शिंदे यांनी केले.यावेळी उपस्थित शेतक-यांनी आपल्या व्यथा रामदास कदम यांच्यासमोर मांडल्या. तसेच त्यांना निवेदनही सादर केले. शिवसेनेकडून न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली.सव्वा लाख शेतकरी वंचितजालना जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख शेतकरी अद्यापही विम्यापासून दूर असल्याची माहिती अंबेकर यांनी दिली. तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विमा कंपन्या आणि कृषी तसेच महसूल खात्याची मिलीभगत असून, पीक कामपणी प्रयोगाबद्दलही खोतकरांनी शंका उपस्थित केली. असा मुद्दा मंत्री कदम यांनी देखील उपस्थित केला. यावेळी शेतक-यांनी कदम यांना मागण्याचे निवेदन सादर केले. तसेच जास्तीत जास्त शेतक-यांनी अर्ज भरून देण्याचे आवाहन रामदास कदम यांनी यावेळी केले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमCrop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी