शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

ड्रायपोर्टच्या माध्यमातून आम्ही मुंबईचा समुद्र जालन्यात आणला! नितीन गडकरी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:52 IST

जालना शहराजवळील ‘गती शक्ती कार्गो टर्मिनल’चे (ड्रायपोर्ट) मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

जालना : मुंबईतील जेएनपीटी बंदरावर मिळणाऱ्या सेवा जालन्यातील ड्रायपोर्टवर मिळणार असून, येथून उत्पादित मालाची निर्यात जगभरात होणार आहे. या ड्रायपोर्टच्या माध्यमातून जणू मुंबईचा समुद्रच आता जालन्यात आणला आहे, असे मत केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

जालना शहराजवळील ‘गती शक्ती कार्गो टर्मिनल’चे (ड्रायपोर्ट) मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यानिमित्ताने दिनेगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, रेल्वेच्या डीआरएम नीती सरकार, जेएनपीटीचे चेअरमन उमेश काळे आदी उपस्थित होते.

कसा आहे ड्रायपोर्ट?पहिल्या फेजमध्ये ड्रायपोर्टचे काम झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात लॉजिस्टिक पोर्ट बांधले जाणार आहेत. भाजीपाला - फळे ठेवण्यासाठी आयक्युब शीतगृह निर्मितीसह इतर कामे होणार आहेत. केंद्र शासनाच्या फूड प्रोड प्रोसिसिंगमध्ये मोठी सबसिडी आहे. त्याचा लाभ घेऊन येथे शीतगृह निर्माण केली जावीत. त्यामुळे इथला भाजीपाला, मोसंबी, लिंबू, कापूस जगभरात निर्यात केला तर किंमत वाढून शेतकऱ्यांना अधिक भाव मिळेल. १५ वर्षांपूर्वीच्या बस, कार स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. जालन्यात रोलिंग मशीन अधिक आहेत. त्यांना याचा लाभ होऊन कच्चा माल मिळेल. ड्रायपोर्टमुळे रोजगार निर्मिती होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल, असेही गडकरी म्हणाले.

जालन्याला सर्वाधिक कनेक्टिव्हिटी : दानवेरेल्वे विभागाला अधिक निधी उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रात मार्गांची कामे करता आली. काही नवीन मार्गांना मंजुरी मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना येथील रेल्वे स्थानकाचे काम सुरू आहे. एकेकाळी मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्याला आज मराठवाड्यात सर्वाधिक कनेक्टिव्हिटी आहे. रेल्वे, रस्त्यांचे चारही बाजूंनी जाळे झाले आहे. आता ड्रायपोर्टमुळे येथून जगभरात मालाची निर्यात करता येणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रprime ministerपंतप्रधान