शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

देशसेवेला वाहिलेले गाव-अकोला देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:39 IST

ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे

नसीम शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे. परिसरात देशसेवेसाठी जवान देणारे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या छोट्याशा गावाने आतापर्यंत ४० च्या वर जवान देशकार्यासाठी दिले आहे. एकीकडे संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सुरू असताना अकोलादेव या तीन ते चार हजार लोकसंख्येच्या गावाचे हे ओतपोत देशप्रेम नजरेआड करुन चालणार नाही. अकोलादेव हे गाव आज हजारो युवकांची सैन्य भरतीची प्रेरणा बनू पाहत आहे.येथील दशरथ जाधव हे गावातील पहिले सैनिक. ते १९६८ मध्ये सैन्यात भरती झाले. माजी सैनिक दशरथ जाधव यांची प्रेरणा घेऊन दरवर्षी एक - दोन युवक सैन्यात भरती होऊ लागले. आतापर्यंत जवळपास ६० जणांनी हा देशसेवेचा वसा स्वीकारला आहे. त्यापैकी आठ सैनिक निवृत्त होऊन गावाकडे परत आले आहे. गावातील सर्व माजी सैनिक हे नवयुवकांना सैनिकी जीवनातील अनुभव सांगून त्यांना सैनिकी नोकरीची प्रेरणा देत आहे.आतापर्यंत दशरथ सवडे, विष्णू सवडे, भास्कर सवडे, कौतिक सवडे, राजीव छडीदार, बद्री सवडे, डिगांबर सवडे हे देशसेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहे. तर लक्ष्मण सवडे, अंकुश सवडे, विठ्ठल दरेकर, मोहन जाधव, संदीप सवडे, योगेश सवडे, भरत भारती, नारायण कदम, संतोष माळी, कृष्णा सवडे, विठ्ठल सवडे, मोहन सवडे, अमोल सवडे, स्वप्नील सवडे, दत्तात्रय सवडे, ईश्वर सवडे, नीलेश सवडे, राजेंद्र शेळके, सोमीनाथ आटपळे, नितेश सवडे आदी अनेक सेवा बजावत आहेत. स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन अकोलादेव या सैनिकी गावात आबालवृद्धांमध्ये राष्ट्रप्रेम उफाळत असते. देशासाठी वीर जवान देणारे हे छोटेसे गाव आज जाफराबाद तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जालना जिल्ह्यात ज्वलंत देशभक्तीचा एक स्त्रोत बनले आहे.पळसखेड्यातून देशसेवेसाठी १८ जवानजालना : भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथील १८ युवक हे भारतीय सैन्य दलात देशाच्या विविध भागांत सेवा बजावत आहेत. या गावाची लोकसंख्या ही केवळ ८८९ आहे. मात्र देशप्रेमाची आवड असलेले गावातील अनेक तरुण सैनभरतीची तयारी करतात.ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.गावात विविध सुविधांचा अभाव असताना गावकºयांचे देशप्रेम वाखाणण्याजोगे आहे. गावातील दोन तरुण सैन्यात होते. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आत्तापर्यत १८ सैनिक देशसेवा बजावत आहेत. यात पंडित खरात, विष्णू रगडे, लिंबाजी खरात, विजय खरात, सतीश खरात, किशोर खरात, योगेश खरात, मनोज खरात, रामेश्वर खरात, विनोद खरात, समाधान खरात, ईश्वर खरात, प्रल्हाद खरात, आजिनाथ खरात, प्रमोद खरात, सुनील खरात असे १८ जवान देशसेवेत आहे. यातील दोन जवान देशसेवा पूर्ण करुन सेवानिवृत्त झाले आहेत.यांचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndependence Dayस्वातंत्र्य दिवस