शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विलास औताडे करोडपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:59 IST

लोकसभेच्या जालना मतदार संघामध्ये निवडणूक लढविणारे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करोडपती असल्याचे त्यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावरुन स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या जालना मतदार संघामध्ये निवडणूक लढविणारे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करोडपती असल्याचे त्यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावरुन स्पष्ट झाले आहे. त्यांच्या विरुध्द धनादेशाचा अनादर करणे, आचार संहिता भंगाच्या गुन्ह्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा दाखल नसून, त्यांची जगंम मालमत्ता १ कोटी ४७ लाख ऐवढी आहे. तर त्यांना जवळपास विविध बँकांच्या कर्जापोटी १ कोटी ५६ लाख रुपयांचे देणे बाकी आहे.जालना लोकसभा मतदार संघात विलास औताडे सलग दुसऱ्यादा निवडणूक लढवत असून, त्यावेळी देखील त्यांनी खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुध्द टक्कर दिली होती. त्यावेळी त्यांना ३ लाख ८५ हजार मते मिळाली होती.२०१९ मध्ये दिलेल्या शपथपत्रात औताडे यांनी दर्शविलेल्या संपत्तीमध्ये त्यांनी प्राप्तीकर विभागाचे विवरण पत्र भरतांना त्रुटी ठेवल्याचे दिसून येते. २०१४ - १५ मध्ये त्यांचे उत्पन्न ५९ लाख रुपये दशर्विले आहे.तर २०१५-१६ मध्ये कुठलेच उत्पन्न झाले नसल्याचे नमृद केले आहे. त्यांच्याकडे ठेवीच्या रुपात १५ लाख ४२ हजार रुपये असून, पत्नीच्या नावे ५० हजार रुपयांच्या ठेवी आहेत. विलास औताडे यांनी शेअर्समध्ये १८ लाख ६० हजार रुपयांची गुतवणूक केली असून, एलआयसीमध्ये ३ लाख तर पत्नीच्या नावे १ लाखांची एलआयसी आहे.एकूणच औताडेंनी सर्व ती माहिती शपथपत्रात दिली आहे.औताडेकडे चार कार असून, दोन दुचाकी आहेत. त्यांनी विविध क्षेत्रातील नागरिकांना ५० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. विलास औताडेंकडे १८ तोळे सोने असून, त्यांच्या पत्नीकडे २० तोळे सोने आहे. विलास औताडे यांच्याकडे ३५ एकर शेती असून, शासकीय देणी १ कोटी ५६ लाख रुपयांची आहे. तर वादग्रस्त शासकीय देणी २३ लाख रुपयांची आहे. विलास औताडे यांचे शिक्षण औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात बीए प्रथम वर्षा पर्यंत झाले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMONEYपैसाjewelleryदागिने