शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

वर्तमानपत्र वाटप करणारा विजय भोंबे बनला फौजदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

गोकुळ सपकाळ जळगाव सपकाळ : कष्ट करण्याची तयारी, अभ्यासातील सातत्य आणि ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र केलेल्या प्रयत्नांमुळे आडगाव भोंबे ...

गोकुळ सपकाळ

जळगाव सपकाळ : कष्ट करण्याची तयारी, अभ्यासातील सातत्य आणि ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र केलेल्या प्रयत्नांमुळे आडगाव भोंबे (ता. भोकरदन) येथील विजय भोंबे हा फौजदार झाला आहे. कष्टातून यशाला गवसणी घालणाऱ्या विजय भोंबे याचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला.

आडगाव भोंबे येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील विजय पांडुरंग भोंबे हा जवळपास दहा वर्षांपूर्वी जळगाव शहरात शिक्षणासाठी गेला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने घरोघरी पेपर वाटण्याचे काम केले. पोलीस खात्यात नोकरी करायची, हे ध्येय उराशी बाळगू विजय भोंबे याने तयारी सुरू केली. विजयने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने हे यश खेचून आणले. २०१७ची पीएसआयची परीक्षा विजयने दिली. त्याच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत अशा टप्प्यावर विजयने यश मिळविले. मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य हे यशाचं गमक असल्याचे तो सांगतो. आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, पत्नी, बहीण, कुटुंबातील सदस्यांसह मित्र परिवाराला जात असल्याचेही त्याने सांगितले. फौजदारपदी निवड झाल्याबद्दल विजय भोंबे याचा आडगाव भाेंबे येथे सरपंच कौशल्याबाई भोंबे, उपसरपंच रामकृष्णा भोंबे, चेअरमन सारंगधर भोंबे, रोकडोबा महाराज संस्थानचे अध्यक्ष संतोषराव भोंबे व ग्रामस्थांनी जंगी स्वागत करून सत्कार केला.

गावात २००वर सरकारी कर्मचारी

पाच हजार लोकसंख्या असलेल्या आडगाव भोंबे येथील २००हून अधिक तरुण शासकीय नोकरीत आहेत. येथील उत्तमराव भोंबे लेफ्टनंट कर्नल, तर पाच वर्षांपूर्वी नंदकिशोर भोंबे सहायक उपायुक्त झाले आहेत. २७ युवक सैन्य दलात असून, एक विस्तार अधिकारी, तीन ग्रामसेवक, २० शिक्षक आहेत. १० जण शाखा अभियंता व इतर काही प्रशासकीय विभागात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.