शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Video: शेतीनेच दिला स्वाभिमान अन् आधार; दोन्ही हात नसताना तरुण राबतोय शेतात

By दिपक ढोले  | Updated: August 17, 2023 18:08 IST

जिद्दीला सलाम! दोन्ही हात नसतानाही तरुण करतोय शेती, मेहनतीने पिकवलं सोन्यासारख पिक

जालना  : भोकरदन तालुक्यातील करजगाव येथील तरुण चौरंगीनाथ प्रभाकर लोखंडे (२८) याला जन्मापासूनच दोन हात नाही. त्यामुळे पायाने लिहून बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सुदैवाने नोकरी लागली नसल्याने शेती करण्यास सुरुवात केली. दोन्ही हात नसतानाही चांगल्याप्रकारे शेती करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

करजगाव येथील प्रभाकर लोखंडे यांना दोन मुले आहेत. त्यातील चौरंगीनाथ या मुलाला लहानापासूनच दोन हात नव्हते. असे असतानाही त्याने जिद्दीच्या जोरावर प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेत पूर्ण केले. नंतर माध्यमिक शिक्षण हे पिंपळगाव रेणुकाई येथे पूर्ण केले. हात नसल्याने त्याने पायाने लिहून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा शोध घेतला. परंतु, काहीच फायदा झाला नाही. नोकरी न मिळाल्याने त्याने दहा एकर शेती करण्याचा निर्णय घेतला. हात नसल्याने शेती करणेही अवघड होते, असे असतानाही मेहनत, जिद्दीच्या जोरावर त्याने शेती करण्यास सुरुवात केली. कधी कोळपणी, तर कधी वखरणी करीत आहे. शेतात मेहनत करून आज तो चांगले उत्पन्न काढत आहे. कामाच्या जिद्दीमुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

सर्व कामे स्वत:च करतोय चाैरंगीनाथचाैरंगीनाथ हा पायाने लिहून शाळा शिकला. त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिवाय, अंघोळ करणे, कपडे घालणे, मोबाइल हाताळणे, बैलगाडी जुपविणे, कोळपणी, वखरणी करणे आदी कामे तो हातानेच करतो. त्याला इतरांच्या मदतीची गरज नाही.

सरकारी नोकरी देण्याची मागणीचौरंगीनाथ याचे अद्याप लग्न झालेले नाही. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. असे असतानाही त्याला नोकरी लागली नाही. १०० टक्के अपंग असताना कोणी नोकरी घेत नाही. त्यामुळे राज्य सरकारने आपल्याला नोकरीवर घ्यावे, असे मागणी चौरंगीनाथ लोखंडे याने केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना