शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

जिल्हाध्यक्षपदासाठी दिग्गज स्पर्धेत

By admin | Updated: April 24, 2015 00:36 IST

जाफराबाद : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या हालचालींना वेग आला असून केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने या पदास आणखी महत्व प्राप्त होत आहे

जाफराबाद : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या हालचालींना वेग आला असून केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने या पदास आणखी महत्व प्राप्त होत आहे. पालकमंत्री व जिल्हाध्यक्ष पद बबनराव लोणीकर यांच्याकडे असल्याने अध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याचा शोध सुरु करण्यात येऊन यामध्ये जिल्हा परिेदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती शेषराव पा. कळंबे यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. शिवाय माजी आ. अरविंद चव्हाण, विलासराव खरात, रामेश्वर भांदरगे, विलास नाईक, बद्री पठाडे, दिलीप तौर यांची सुध्दा नावे स्पर्धेत आहेत.भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदासाठी अद्याप जाफराबाद तालुक्याला संधी मिळाली नसून, राजकारणात शेषराव पा. कळंबे हे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. सहकार क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बॅँकेपासून जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, पक्ष संघटनात्मक विविध पातळीवर काम केले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी शेषराव पा. कळंबे यांना देण्यात यावी, अशी मागणी सुध्दा जाफराबाद तालुक्यातून पुढे येत आहे.जिल्हाध्यक्षपदाच्या इच्छुकांमध्ये तशी दिग्गज दिसून येते. यात माजी आ. विलास खरात, अरविंद चव्हाण हे देखील सर्वच क्षेत्रात अनुभवी असून बद्री पठाडे, रामेश्वर भांदरगे, विलास नाईक, दिलीप तौर यांनी अनेक वर्षापासून पक्ष संघटनेचे काम सुरुच ठेऊन चांगले काम केले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळून पक्ष संघटन वाढविणे हे यांच्यासाठी नवीन नाही.मात्र सत्तेतील जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळून सर्वांची कामे, शासनाच्या विविध योजना याचा लाभ मिळवून देऊन कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याची खरी जबाबदारी आहे.महाराष्ट्राचे नेते प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पा. दानवे यांच्या स्व जिल्ह्यातील हा प्रश्न असल्याने त्यांना ह्या पदासाठी कोण योग्य उमेदवार आहे. हे कोणी सांगण्याची गरज नाही. प्रश्न आहे तो फक्त एकनिष्ठेचा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा हा आहे. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने जिल्ह्यामध्ये पक्षाचे काम वाढवून समतोल कोण राखेल याचा विचार करुन या पदाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीमध्ये याविषयी सर्व पातळीवर चर्चा होऊन जाफराबाद तालुक्याला संधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.