करंजळा येथे ३१ जणांचे रक्तदान
महाकाळा (अंकुशनगर) : अंबड तालुक्यातील करंजळा येथे शिवशंभू सेवा प्रतिष्ठानच्यावतीने शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित शिबिरात ३१ दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास बाबासाहेब नांद्रे, सरपंच विठ्ठल धुमक, उपसरपंच नामदेव सटाले, ज्ञानेश्वर आमटे, राजेंद्र नांद्रे, भास्कर नांद्रे, गणेश तेलंग, नितीन नांद्रे, तात्यासाहेब नांद्रे, शंकर नांद्रे, ज्ञानेश्वर प्रधान, बाळू वावरे, भगवान धुमक, युवराज शिंदे, बाबूराव वाघमारे, गणेश नांद्रे, दत्ता नांद्रे , राम सावंत, गणेश आमटे, लहू शिंदे, अक्रूर नांद्रे आदींची उपस्थिती होती.
लतिफपूर येथे कार्यक्रम
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील लतिफपूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास हरिभाऊ मोरे, शिवाजी शिनगारे, विष्णू शिनगारे, दिगंबर दाभाडे, मंगेश मोरे, अंकुश मोरे, शेख अब्दुल हक यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
नेहरू विद्यालय, गोलापांगरी
जालना : तालुक्यातील गोलापांगरी येथील नेहरु माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्रीकृष्ण काळे, थोरवे, ठाकरे, पाटील, धाडे, ए. यु. मोरे, राजगुरू, नरवडे, एस. एस. कुलकर्णी, सुनील मोरे, टी. डी. मोरे, विजय सोनुने आदींची उपस्थिती होती.
पाटील विद्यालय, नजीकपांगरी
बदनापूर : तालुक्यातील नजीकपांगरी येथील कै. नानासाहेब पाटील विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक पी. पी. वाघ, व्ही. एस. निकाळजे
यांनी मार्गदर्शन केले.
इंदलकरवाडी येथे कार्यक्रम
जालना : इंदलकरवाडी येथील शाळेत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर इंदलकर, माजी सरपंच डिगांबर शेळके, माजी उपसरपंच राजू इंदलकर, विठ्ठल इंदलकर, संतोष मोरे, सखाराम इंदलकर, मुख्याध्यापक डी. बी. घुमरे आदींची उपस्थिती होती.
ग्रामसंसद कार्यालय, धावडा
धावडा : येथील ग्रामसंसद कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, बी.बी. सरोदे, उपसरपंच इकबाल पठाण, माजी सरपंच बेलाअप्पा पिसोळे, तंटामुक्त अध्यक्ष डॉ. प्रमोद कुलकर्णी, तुकाराम बोराडे, ईश्वर सपकाळ, ज्ञानेश्वर आहेर, रामराव पवार, धनंजय तंबडे, गजानन गवळी, विलास भडगे, ग्यानदेव निकाळजे, शांतीलाल खैरे, दिनेश देवकर, सुनील बोराडे, समाधान सुडके, मधुकर सनान्से, सागर टेंभरे, संभाजी निकाळजे, देवराव पवार, अतुल वाघ, मोतीलाल वैरी, राजीव भागवत, विजय देवकर, दिलीप देवकर, रामदास साबळे आदींची उपस्थिती होती.