वालसावंगी येथील बालाजी विद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब कोथळकर, संजय कोथळकर यांनी सन २००५ पासून या पालखी सोहळ्यास सुरुवात केली होती. या पालखी सोहळ्यात प्रतिवर्षी दीड हजारावर महिला, पुरुष भाविक सहभागी होतात. विशेष म्हणजे शेगाव नगरीत जाणाऱ्या सर्वात मोठी दिंडीपैकी या दिंडीचा दुसरा नंबर व शिस्तबद्धतेत प्रथम क्रमांक लागतो. यामुळेच संस्थानच्या वतीने वालसावंगी दिंडीचा गौरव होतो. या दिंडीत दरवर्षी नवनवीन पोषाख कोड असतात. महिलांना एकाच प्रकारच्या साड्या व पुरुषांना एकाच प्रकारचे सारखे जाॅकेटसह पोषाख असतो. याशिवाय दिंडी मार्गावरील विविध गावात या दिंडीचे उत्साहात स्वागत केले जाते. या दिंडीत भोकरदन तालुक्यातील वालसावंगीसह परिसरातील पारध, धामणगाव, मासरुळ, वालसा, भारज, सोयगाव शेदूंर्णीसह इतर गावांतील भाविक या दिंडीत सहभागी होतात. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याने शेगाव संस्थानकडून पालखी सोहळा रद्द करण्यात आला असल्याचे दिंडीचालक संजय कोथळकर, नागपुरे यांनी सांगितले.
दरवर्षी पायी दिंडी वालसावंगी ते शेगाव जाते; माञ यंदा कोरोनामुळे आम्हाला दिंडीत जाता येत नसल्याचे येथील सुमनबाई जाधव, कौशल्याबाई जाधव, आदी महिलांनी सांगितले.