शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वज्रमूठ, युती; बाजार समिती निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर निर्णय!

By विजय मुंडे  | Updated: April 3, 2023 19:26 IST

पाच बाजार समित्यांमध्ये ५३८ जणांचे अर्ज दाखल; पॅनलबाबत चर्चेचे गुऱ्हाळ

जालना : जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील ९० जागांसाठी ५३८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी युती-महाविकास आघाडीचा पुरस्कृत पॅनलबाबतचा निर्णय अंतिम झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी, युती असली तरी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जाणार असल्याचे दिसत आहे.

राज्यातील सत्तांतराचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावरही झाले आहेत. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना (शिंदे गट) अशी स्थिती आहे. सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते वज्रमूठ बांधून सभा घेत आहेत. या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकांची रेलचेल सुरू आहे. पक्षपुरस्कृत पॅनल या निवडणुकीत उतरत असल्याने राजकीय दृष्ट्या या निवडणुकांनाही महत्त्व आले आहे. परंतु, राज्यात महाविकास आघाडी- युती असली तरी स्थानिक पातळीवर काही नेत्यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही बाजार समिती निवडणुकांसाठी महाविकास आघाडी, युतीसाठी चर्चा होत असल्या तरी स्थानिक पातळीवरील पक्षीय मैत्रीनुसारच पॅनल उभे राहण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी पाच बाजार समित्यांच्या ९० जागांसाठी तब्बल ५३८ अर्ज दाखल झाले आहेत.

आरक्षणनिहाय अर्जसहकारी संस्थांचा मतदारसंघातून सर्वसाधारणच्या ३५ जागांसाठी १८८, महिला राखीवच्या १० जागांसाठी ५८, इतर मागासवर्ग राखीवच्या पाच जागांसाठी ३०, विमुक्त जाती, जमाती राखीवच्या पाच जागांसाठी ३३ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदारसंघातून सर्वसाधारणच्या १० जागांसाठी ७८, अनुसचूचित जाती, जमाती राखीवच्या पाच जागांसाठी ३८, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या पाच जागांसाठी ३१ अर्ज दाखल झाले आहेत. व्यापारी, अडते मतदारसंघाच्या १० जागांसाठी ५० अर्ज, तर हमाल, मापारी मतदारसंघाच्या पाच जागांसाठी ३२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

२० तारखेनंतर होणार चित्र स्पष्टदाखल अर्जांची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे, तर ६ एप्रिल रोजी याद्यांची प्रसिद्धी केली जाणार आहे. २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेला निवडणूक रिंगणातून कितीजण माघार घेतात यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्जांची छाननीबाजार समिती दाखल अर्जअंबड- १०२घनसावंगी- १०६परतूर- ६६आष्टी- ७८मंठा- १७७

टॅग्स :JalanaजालनाElectionनिवडणूक