घनसावंगी : केवळ जाहिरातबाजी करणाºया केंद्र आणि राज्य सरकारवरचा शेतकरी व सर्वसामान्यांचा विश्वास उडाला असून, धर्माला आत्महत्या करायला लावणारे हे अधर्मी सरकार असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी येथे रविवारी आयोजित शेतकरी मेळावा व पक्ष कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, सचिव मिलिंद नार्वेकर, डॉ. हिकमत उडाण, विनोद घोसाळकर, लक्ष्मण वडले, शिवाजीराव चोथे, संतोष सांबरे, ए.जे. बोराडे, भास्कर अंबेकर, जगन्नाथ काकडे, डॉ. संजय कच्छवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, की आंदोलन करणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करता आणि लष्करावर दगडफेक करणाºयांवरील गुन्हे माफ करता? पंतप्रधानांनी पतंग उडविण्यापेक्षा श्रीनगरमध्ये जावून तिरंगा फडक वावा, असेही ते म्हणाले. सरकारचे उंबरठे झिरजवूनही न्याय मिळाला नाही, म्हणून धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. धर्माला आत्महत्या करायला लावणारे हे अधर्मी सरकार असल्याचा घणाघात त्यांनी केला. या सरकारला शेतकºयांचे काहीच देणे-घेणे नाही परंतु शिवसेना कायम शेतकºयांच्या पाठीशी आहे.पंधरा वर्ष सत्तेत राहून डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. शिवसेना शेळी, कासव, ससा, गांडूळ झाली पण आम्ही धरणात लघुशंका करण्याची भाषा कधीच केली नाही, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीने नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला. मेळाव्याला शेतकऱ्यांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती.