शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा काळातच विद्यापीठ निवडणुका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:56 IST

शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यास एक महिन्याच्या कालावधी शिल्लक आहे. त्यातच १ मार्च पासून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होत असून, ऐन परीक्षा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अजब फतवा काढत महाविद्यालय स्थानिक पातळीवरील निवडण्यात येणा-या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यास एक महिन्याच्या कालावधी शिल्लक आहे. त्यातच १ मार्च पासून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होत असून, ऐन परीक्षा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अजब फतवा काढत महाविद्यालय स्थानिक पातळीवरील निवडण्यात येणा-या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा २०१७ च्या कलम ९९ अ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद गठीत करण्या बाबत २२ फेब्रुवारीच्या पत्रानुसार आदेशीत केले आहे. मात्र, प्रत्यक्षात हे पत्र महाविद्यालय पातळीवर दोन दिवसापूर्वीच मिळाल्याचे सूत्रांकडून माहिती आहे. मात्र, या निवडणूकीच्या काळात विद्यापीठ परीक्षा विभाग यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिक परीक्षेला १ ते १४ मार्चपर्यंत चालणार असून, यानंतर लगेच १६ मार्चपासून पदवीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला देखील लागले आहे.आशावेळी या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा फायदा विद्यार्थी यांना कितपत होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडणे साहजिक आहे.निवडणूक प्रक्रिया २३ मार्च पासून सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालय स्तरावर ३ मार्च रोजी विद्यार्थी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ६ मार्च रोजी आक्षेप, छाननी व अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. ८ मार्च रोजी सचिवपदाकरीता नाव नोंदविण्यात येऊन १५ मार्च रोजी सचिव पदाची निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचा अहवाल १७ मार्च रोजी विद्यापीठ संचालक विभाग यांना सादर करण्यात येणार आहे. मात्र, या निवडणुकीची गुणवंत विद्यार्थी यांना माहिती नसून ही पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा लागणार आहे.