शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

तुरीच्या दरात एकतर्फी तेजी; कापूस, सरकी ढेप महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

संजय लव्हाडे लोकमत न्यूज नेटवर्क जालना : मागील वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन झाल्यामुळे आणि नाफेडने विक्री बंद केल्यामुळे तुरीच्या ...

संजय लव्हाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : मागील वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन झाल्यामुळे आणि नाफेडने विक्री बंद केल्यामुळे तुरीच्या दरात तेजी आली. परदेशातून मागणी वाढल्यामुळे कापूस महागला असून, त्यामुळे सरकी ढेपीच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. सरत्या आठवड्यातील या घडामोडींमुळे व्यापारी आणि शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले.

दिल्ली बाजारपेठेत बर्माच्या नवीन लेमन तुरीच्या दरात सतत तेजी आल्यामुळे दर सहा हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल असे झाले. त्यातच मागील वर्षीपेक्षा चालू वर्षात तुरीचे उत्पादन कमी झाले आणि नाफेडनेही ३० जानेवारीपासून तुरीची विक्री बंद केली. त्यामुळे तुरीच्या दरात एकतर्फी तेजी आली. जालना बाजारपेठेत सध्या तुरीची आवक दररोज तीन हजार पोते इतकी असून, ३०० रुपयांच्या तेजीनंतर भाव सहा हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

निर्यात वाढल्यामुळे कपाशीच्या दरातही मोठी तेजी आली आहे. सरकारने कपाशीच्या खरेदी-विक्रीमध्ये कस्टम ड्यूटी वाढवल्यामुळेदेखील कापसाचे दर वाढले. जाणकारांच्या माहितीनुसार ब्राझील देशात यंदा कपाशीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे त्यांना भारतातून कापूस मागवावा लागत आहे. त्यामुळे भारतात कापसाच्या दरात तेजी आली आहे. जालना बाजारपेठेत कापसाचे दर सहा हजार ते ६१०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

कापूस महागल्यामुळे सरकी ढेप दरातही तेजी आली. सरकी ढेप क्विंटलमागे ३०० रुपयांनी महागली. सध्या सरकी ढेपचे भाव २६५० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. हा सरकी ढेपच्या दरातील चालू वर्षामधील उच्चांक मानला जातो.

गव्हाचे भाव स्थिर म्हणजे १६५० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीच्या दरात ४०० रुपयांची मंदी आल्याने भाव १२०० ते २५०० रुपये प्रतिक्विं. असे आहेत. मका १२५ रुपयांच्या मंदीनंतर एक हजार ५० ते १२५० रुपये प्रतिक्विंटलवर आहे. बाजरी ११२५ ते १४०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

......

तेलामध्ये क्विंटलमागे ५०० रुपयांची तेजी

तेलामध्ये क्विंटलमागे प्रत्येकी ५०० रुपयांची तेजी आली.

सोयाबीन तेल - ११,८००

सरकी तेल -११,६००

पामतेल - ११,३००,

सूर्यफूल तेल -१३,०००

शेंगदाना तेल- १५,००० ते १६,०००

करडी तेल - १७,००० ते १८,०००

......

डाळींच्या दरातही वाढ

डाळींच्या दरातही २०० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत तेजी आली. हरभरा डाळ ५३०० ते ५५००, तूरडाळ ९००० ते १०,०००, मूगडाळ ९६०० ते ९८००, मसूर डाळ ६५०० ते ६८०० आणि उडद डाळीचे दर ९००० ते १०,५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

.......

सोन्यात किंचित घसरण

सर्व किराणा आणि धान्य बाजारात तेजी असताना सोन्याच्या दरात मात्र किंचित घसरण झाली. तोळ्यामागे १५०० रुपयांची मंदी आल्यानंतर सोन्याचे दर ४९ हजार ५०० रुपये तोळा झाले. चांदीचे दर स्थिर म्हणजे ६८ हजार ९०० रुपये प्रतिकिलो आहेत.

.........