शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बडी सडकवर अघोषित संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:32 IST

शिवप्रतिष्ठानचे प्रणेते संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत बडी सडकवरील आर्य समाज मंदिरात बैठक पार पडली. यावेळी सकाळी ९ वाजेपासूनच तगडा बंदोबस्त लावल्यात आल्याने परिसरात अघोषित संचारबंदी असल्यासारखे वातावरण होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिवप्रतिष्ठानचे प्रणेते संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत बडी सडकवरील आर्य समाज मंदिरात बैठक पार पडली. यावेळी सकाळी ९ वाजेपासूनच तगडा बंदोबस्त लावल्यात आल्याने परिसरात अघोषित संचारबंदी असल्यासारखे वातावरण होते. ज्या भागात ही बैठक होणार होती, त्या परिसरातील चाहरही बाजूचे रस्ते बंद करून वाहतूक इतरत्र हलविण्यात आली होती. अशा स्थितीत अफवांचे पीक वेगात येत होते. नूतन वसाहत भागात दडगफेक झाली तर, काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. त्याचे पडसाद बैठकस्थळी उमटत होते.विविध संघटनांनी भिडे यांच्या दौऱ्याला पायबंद करण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी मान्य झाली नाही. सकाळी ठरल्या प्रमाणे भिडे व त्यांचे समर्थक हे जालन्यात दाखल झाले होते. त्यांच्या समर्थकांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजेपासून सुरू झालेली बैठक दुपारी दीड वाजेपर्यंत चालली. बैठक झाल्या नंतरही भिडे यांनी अन्य शहरातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. ज्याची ओळख आहे अशांना भिडेंच्या भेटीसाठी आत जाऊ दिले जात होते.बैठकी बाहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक हे साध्या वेशात लोकांमध्ये मिसळून होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास भाजपचे शहराध्यक्ष सिध्दीविनायक मुळे, नगरसेवक अशोक पांगारकर, चंपालाल भगत यांनीही घटनास्थळी भेट देऊन भिडेंची भेट घेतली. वीरेंद्र धोका यांच्या बडीसडकवरील निवास्थानी बैठकीनंतर भिडे यांनी अल्पोपाहार घेतला. त्यावेळी देखील भिडेंना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. एकूणच भिडे यांच्या या दौºयामुळे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह बजरंग दलाचे कार्यकर्तेही बैठकस्थळी होते.निदर्शने करणा-यांना पोलिसांनी घेतले ताब्यातबैठकी दरम्यान शिवाजीपुतळा भागात निदर्शने करणा-यांना ताब्यात घेऊन पोलीसांनी त्यांना सदरबजार पोलीस ठाण्यात हलविले होते. हे कार्यकर्ते बैठक स्थळावरून जाताना त्यांनी भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने तेथे काही काळ वातावरण तंग झाले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीagitationआंदोलन