शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

लाच प्रकरणात टंकलेखक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:54 IST

उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयांतर्गत भोकरदन येथील उपविभाग कार्यालयातील टंकलेखक कनिष्ठ सहायकास ५०० रुपयांची लाच घेताना एसीबीने जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयांतर्गत भोकरदन येथील उपविभाग कार्यालयातील टंकलेखक कनिष्ठ सहायकास ५०० रुपयांची लाच घेताना एसीबीने जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी भोकरदन येथे करण्यात आली.अनिल प्रभाकरराव कुलकर्णी असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा परिषद उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयांतर्गत (ल.पा.) भोकरदन येथील उपविभाग कार्यालयात अनिल कुलकर्णी हे टंकलेखक कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांची वरूड (बु.) शिवारात शेती आहे. या जमिनीचा अकृषक परवाना काढण्यासाठी तक्रारदाराला भोकरदन येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद (ल.पा.) उपविभाग भोकरदन येथून नाहरकत प्रमाणपत्र हवे होते. या प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराने कुलकर्णी यांच्याकडे रितसर अर्ज केला होता.मात्र, कुलकर्णी यांनी एक हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी भोकरदन येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. नाहरकत प्रमाणात्रासाठी एक हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारल्यानंतर कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोनि विनोद चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, ज्ञानदेव जुंंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, गंभीर पाटील, ज्ञानेश्वर म्हस्के, महेंद्र सोनवणे, संदिप लव्हारे, रमेश चव्हाण, सचिन राऊत, खंदारे यांनी केली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटक