दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा
जालना : परतूर तालुक्यातील पांडेपोखरी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ९०० रुपये किमतीच्या १५ बॉटल जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. याप्रकरणी दीपक पवार यांच्या फिर्यादीवरून संशयित अच्युत लोखंडे (रा. पांडेपोखरी) याच्याविरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन : दोघांवर कारवाई
जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नीशा बनसोड यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ट्रकची लोखंडी पोलला धडक
जालना : चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवून ३३ केव्हीच्या फिडरवरील लोखंडी पोलला धडक देऊन ६० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना भोकरदन-जालना रोडवरील डावरगाव फाट्याजवळ शनिवारी घडली. याप्रकरणी संतोष खोब्रागडे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक लोकेंद्रसिंग छोटेसिंग याच्याविरुध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोह सुरडकर करीत आहेत.