शिवाजी पुतळा येथून मोबाईल लंपास
जालना : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मोबाईल चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी मेघराज हुकूमचंद चौधरी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास मपोहेकॉ गिरी हे करीत आहेत.
२४ वर्षीय महिलेचा छळ
जालना : जमीन घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत एका २४ वर्षीय महिलेस मारहाण करून मानसिक छळ केल्याची घटना गांधीनगर येथे घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून गणेश उत्तम डांगे (३० रा. तुळजा भवानी मंदिर, गांधीनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रॅक्टरची बसला धडक
मंठा : उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने बसला धडक दिल्याची घटना मंठा - वाटूर रस्त्यावरील देवठाणा पाटीजवळ गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी भारत रोहिदास कायंदे (रा. माळसापूर, जि.बीड) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.कॉ. व्ही. आर. कसबेकर हे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार उत्तम राठोड यांनी दिली.
वीज वितरणच्या सहायक अभियंत्याला धमकी
मंठा : येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता संदीप लक्ष्मण जैस्वाल यांना गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी संजय तुकाराम पवार यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार हे करीत आहेत.