शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईसाठी दोन हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:18 IST

आरटीई अंतर्गत उपलब्ध ३ हजार ८३५ जागांसाठी जिल्ह्यातून २ हजार ४०२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत.

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरटीई अंतर्गत उपलब्ध ३ हजार ८३५ जागांसाठी जिल्ह्यातून २ हजार ४०२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी २२ मार्च ही अंतिम तारीख असून, पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.आर्थिक दुर्बल घटक आणि मागास बालकांना अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअल्पसहाय्य शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. या अंतर्गत जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून २१६ शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली ही प्रक्रिया तांत्रिक बिघाड आणि शाळांची उदासिनता आदी कारणांनी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे.मागील काही वर्षांपासून शिक्षण संचालक विभागाने आरटीई प्रवेशाचे नियम कडक करून प्रवेशासाठी पालक राहत असलेल्या जागांचे अंतर आणि दुय्यम निबंधक कार्यालयाचे भाडेपट्टीची अट ठेवल्याने बनावट पध्दतीने प्रवेश मिळविणाऱ्यांना चाप बसला असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध जागांपैकी दरवर्षी अनेक जागा रिक्त राहत आहेत. यावर्षी १६ फेब्रुवारी ते २२ मार्चपर्यत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३ हजार ८३५ जागांसाठी जिल्ह्यातून २ हजार ४०२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत.यासाठी २२ मार्च ही अंतिम तारीख असून, १ हजार ४३२ जागा रक्त राहण्याची शक्यता आहे.मोठ्या शाळांवर भर३ हजार ८३५ जागांसाठी जिल्ह्यातून २ हजार ४०२ अर्ज आले आहेत. यापैकी शहरातील नामांकित शाळांसाठी बहुतांश अर्ज आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून, रिक्त राहत आहेत. तर दुसरीकडे काही शाळांसाठी अद्यापही अर्ज आलेले नाहीत.जनजागृतीचा अभावशिक्षण विभागाचा जनजागृतीचा अभाव यात दिसून येतो. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन असल्याने याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. ग्रामीण भागात इंटरनेट रेंजचा अडचणी येत असल्याने अनेकांचे अर्ज अर्धवट भरले गेल्याची माहिती आहे.२१६ शाळांमध्ये : २५ टक्के प्रवेशआर्थिक दुर्बल घटक आणि मागास बालकांना अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअल्पसहाय्य शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. या अंतर्गत काही वर्षांपासून २१६ शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSC STअनुसूचित जाती जमाती