शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुद्देमालासह दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:55 IST

चोरीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ६० हजारांच्या मुद्देमालासह चोरलेली एक म्हैस जप्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चोरीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ६० हजारांच्या मुद्देमालासह चोरलेली एक म्हैस जप्त केली आहे.नवीन मोंढा परिसरातील रामदयाळ बियाणी यांच्या गोदामाचे शटर तोडून चोरट्यांनी एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना एप्रिल महिन्यात घडली होती. या प्रकरणी राकेश बियाणी यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मोंढा परिसरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.कन्हैय्यानगर परिसरातील संशयित राहुल सुदाम जाधव (२५) याने आपल्या साथीदारासह गोदामात चोरी केल्याची माहिती विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना खब-यांमार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष कृती दलाच्या पथकाने राहुल जाधव यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संशयित भोलू भीमराव निकाळजे यांच्यासह ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी भोलू निकाळजे यालाही ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या एक लाख ६० हजारांच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेले दोन लाखांचे वाहन जप्त केले. चौकशीत भोलू निकाळजे याने काही साथीदारांसह जानेवारी महिन्यात लालबाग परिसरातून एक म्हैस चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या पठारदेऊळगाव शिवारातील शिवारातून चोरीस गेलेली म्हैस ताब्यात घेतली.पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यामार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक जाधव, ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, कैलास शर्मा, किरण चव्हाण, नंदकिशोर कामे, गजू भोसले, आकाश कुरील यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :ThiefचोरArrestअटक